Agriculture news in Marathi, Best Support to Farmer Companies from NABARD | Agrowon

नाबार्डकडून शेतकरी कंपन्यांना सर्वतोपरी साह्य

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

सोलापूर ः शेतीमालाचे उत्पादन आणि मार्केटिंगसह प्रक्रियेमध्ये शेतकरी कंपन्यांना मोठी संधी आहे. या कामात नाबार्ड सर्वतोपरी साह्य द्यायला तयार आहे, असे नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप झिले यांनी सांगितले. 

नाबार्ड व यशस्विनी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी अंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन शेतकरी उत्पादक कंपन्याची स्थापना झाली. त्या तिन्ही कंपनीचे (पी.एम.आय.सी) बैठक नुकतीच झाली. त्यात श्री. झिले बोलत होते. 

सोलापूर ः शेतीमालाचे उत्पादन आणि मार्केटिंगसह प्रक्रियेमध्ये शेतकरी कंपन्यांना मोठी संधी आहे. या कामात नाबार्ड सर्वतोपरी साह्य द्यायला तयार आहे, असे नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप झिले यांनी सांगितले. 

नाबार्ड व यशस्विनी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनी अंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन शेतकरी उत्पादक कंपन्याची स्थापना झाली. त्या तिन्ही कंपनीचे (पी.एम.आय.सी) बैठक नुकतीच झाली. त्यात श्री. झिले बोलत होते. 

कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. लालासाहेब तांबडे, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे व्यवस्थापक किसन मोटे, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक विक्रम फुटाणे या वेळी उपस्थित होते. या वेळी नाबार्ड व यशस्विनी ॲग्रो प्रोड्यूसर कंपनीतंर्गत स्थापन झालेल्या श्री. गेनसिद्ध, शिवराई व फार्मर डिलाईट शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

श्री. झिले यांनी सध्याच्या शेती क्षेत्रातील बदल आणि शेतकरी कंपन्यांना आलेले महत्त्व, यावर माहिती दिली. तसेच स्थापन झालेल्या कंपनीच्या तीन महिन्यांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच कंपन्यांचे पुढील नियोजन, नाबार्डकडून कंपनीस मिळणाऱ्या योजना व कौशल्याचे प्रशिक्षण, एक्‍सपोजर व्हिजिट व विविध प्रशिक्षण याविषयी मार्गदर्शन केले. 

डॉ. तांबडे यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी व्यवसाय निवडताना कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायला हव्यात, त्यातील संभाव्य धोके, मार्केटमध्ये आपला प्रॉडक्‍ट टिकून राहण्यासाठी कोणकोणत्या बाबी लक्षात घ्यायला पाहिजेत, याबाबत मार्गदर्शन केले. 

श्री. मोटे यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांना बॅंकिंग क्षेत्राविषयी मार्गदर्शन केले आणि आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने करायला पाहिजे, हे सांगितले. श्री. फुटाणे यांनी आत्माच्या योजनांविषयी माहिती दिली. यशस्विनी ॲग्रो कंपनीच्या अध्यक्षा अनिता माळगे यांनी सूत्रसंचालन केले.


इतर ताज्या घडामोडी
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...
निर्यातबंदीमुळे कांदा फुगवटा;...पुणे: कांद्यावरील संपूर्ण निर्यातबंदी तातडीने...