पानांचे दर दबावात; उत्पादकांना फटका

गेल्या आठ महिन्यांपासून बाजारपेठेत पानांच्या (नागवेल) मागणीत वाढ वाढ झाली नाही. त्याचा फटका दर वाढीला बसला असून, दसरा आणि दिवाळीत पानांचे दर दबावात असल्याने पान उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.
betel leaf
betel leaf

सांगली : गेल्या आठ महिन्यांपासून बाजारपेठेत पानांच्या (नागवेल) मागणीत वाढ वाढ झाली नाही. त्याचा फटका दर वाढीला बसला असून, दसरा आणि दिवाळीत पानांचे दर दबावात असल्याने पान उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी पानाला अपेक्षित दर नसल्याने पान उत्पादक शेतकऱ्यांनी पानांचे मळे काढून टाकले होते. दराची अशी स्थिती राहिल्यास पानमळेच अस्तित्वात राहणार नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात पान मळ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे. दरम्यान, मार्चमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशातील बाजारपेठ बंद होती. त्याचा फटका पान उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. सध्या देशभरातील बाजारपेठ खुल्या झाल्या असल्या, तरी पानांना बाजारपेठेत अपेक्षित मागणी नसल्याचे चित्र आहे.  ऑक्टोबर महिन्यामध्ये अतिवृष्टीचा फटका पान शेतीला बसला आहे. मिरज पूर्व भागात वादळी वाऱ्यांमुळे अनेक पानमळे जमीनदोस्त झाले. त्यात मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव झाला परिणामी वेलींची वाढ खुंटली. दसरा-दिवाळी या सणाला पानांची मोठी मागणी असते. त्यामुळे दरात वाढ होईल अशी आशा पान उत्पादक शेतकऱ्यांना होती. दसऱ्याला काही अंशी पानांची मागणी वाढली. दिवाळी सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. बाजारात पानांची मागणी वाढली आहे. मात्र दरात वाढ झाली नसल्याने पान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. वास्तविक पाहता गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी पानांना आठशे ते तीन हजार रुपये प्रति कवळी असा दर मिळाला होता. त्यामुळे पानमळा क्षेत्र स्थिर होते. मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आणि बाजारपेठा बंद झाल्या. त्यामुळे पानांच्या मागणीत घट झाली. दरम्यान, तीन महिन्यांनंतर बाजारपेठा खुल्या झाल्या. परंतु मागणीत वाढ झाली नाही.

प्रतिक्रिया गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून बाजारपेठेत पानांना मागणी नाही. दसऱ्यामध्ये काही अंशी पानांच्या मागणीत वाढ झाली. परंतु दरात वाढ झाली नाही त्यामुळे आमचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. - भाऊसो नागरगोजे,  पान उत्पादक शेतकरी, नरवाड, ता. मिरज

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com