बोंड अळी नियंत्रणासाठी सजग राहा ः डॉ. प्रसाद

बोंड अळीसह बोंडसडचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली असली, तरी पुढील हंगामात याचे नियंत्रणासाठी आतापासूनच सजग राहण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी केले.
Beware of bond larvae control: Dr. Offerings
Beware of bond larvae control: Dr. Offerings

चंद्रपूर ः वातावरणातील बदल त्यासोबतच कापसाची मॉन्सूनपूर्व लागवड या व इतर अनेक नैसर्गिक कारणांमुळे या वर्षी बोंड अळीसह बोंडसडचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली असली, तरी पुढील हंगामात याचे नियंत्रणासाठी आतापासूनच सजग राहण्याची गरज असल्याचे मत केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी केले.

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या वतीने गुलाबी बोंड अळीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर शेतकरी प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन वरोरा येथे करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

डॉ. प्रसाद म्हणाले, की किडीची वेळीच माहिती होत त्याचे नियंत्रण करता यावे याकरिता शेतकऱ्यांनी संस्थेद्वारा विकसित केलेले कामगंध सापळे वापरावे. किडीचा जीवनक्रम संपुष्टात आणण्यासाठी शेतकऱ्यांनी शिफारशीत उपाययोजनांचा अवलंब केला पाहिजे. त्यामुळे पुढील हंगामात या संकटाची तीव्रता कमी करता येईल. वरिष्ठ कीटकशास्त्रज्ञ तसेच जिल्हा प्रकल्प समन्वयक डॉ. चिन्ना बाबू नाईक यांनी प्रकल्पाचे स्वरूप, गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची कारणे, एकात्मिक व्यवस्थापन पद्धती याविषयी माहिती दिली. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरणही प्रश्‍नोत्तराच्या माध्यमातून या वेळी करण्यात आले.

वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. रामकृष्ण जी. आय. यांनी कपाशीतील अन्नद्रव्य व खत व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. दीपक नगराळे यांनी बोंडसड या रोगाविषयी माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com