agriculture news in marathi Beware of Hurricane Toutke | Agrowon

‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्या :

टीम अॅग्रोवन
रविवार, 16 मे 2021

नाशिक : ‘‘प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार १६  व १७ मे रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

नाशिक : ‘‘प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार १६  व १७ मे रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नाशिक जिल्हा व गुजरात राज्याच्या तटवर्ती भागात याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेणे आवश्यक आहे’’, असे आवाहन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले आहे.

१५ मे रोजी अरबी समुद्रातील ‘तौत्के’ या चक्रीवादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनार पट्टीवर ४० ते ६० किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील. १६ मे रोजी या वादळाच्या प्रभावाने महाराष्ट्र व गोवा किनारपट्टीवर ५० ते ७० किमी प्रतितास, तर १७ मे रोजी या वादळाच्या प्रभावाने ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

चक्रीवादळ कालावधीत वाहणारा सोसाट्याचा वारा व मुसळधार पर्जन्यवृष्टी लक्षात घेऊन नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्ष:०२५३-२३१७१५१ किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ ला संपर्क करावा. हवामानाची माहिती भारतीय हवामान खात्याच्या www.imd.gov.in या संकेतस्थळावरून घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका. अतिवृष्टीच्या कालावधीत आपण जागरूक राहावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. 

शेतीमाल सुरक्षित स्थळी ठेवा 

वाहणाऱ्या वाऱ्यामुळे किंवा तुरळक पावसामुळे शेत मालाचे नुकसान होऊ नये, या साठी शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. शेतीमाल सुरक्षित स्थळी ठेवावा. पाळीव प्राण्यांसाठी व पक्ष्यांसाठी तयार केलेल्या शेडची दुरुस्ती व वाऱ्यामुळे शेडचे पत्रे उडू नये, यासाठी दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवल्यास त्या बाबत जागरूक राहावे व योग्य ती दक्षता घ्यावी, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.


इतर बातम्या
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
सातव्या वेतन आयोगासाठी महामंडळांमधील...नगर : राज्यातील विविध महामंडळांमधील अधिकारी-...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूरला ...रत्नागिरी : सलग दुसऱ्या दिवशी रत्नागिरी...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना...वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच...
पशुचिकित्सा व्यावसायिक संघटना करणार...नागपूर : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या...
जागोजागी होणारी लुट थांबवा, ...नगर : ‘‘राज्यात जागोजागी प्रत्येक क्षेत्रात...
‘घटनादुरुस्ती करून आरक्षण देणे  हाच...कोल्हापूर : घटनादुरुस्ती करून मराठा आरक्षण देणे...
कोकणातील डच, पोर्तुगाल वखारींचे होणार...पुणे : भारतातील आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी...
गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणासाठी ...मुंबई ः गोसीखुर्द प्रकल्प पूरनियंत्रणाबाबत...
प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींना पाच पट...नाशिक : देशातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग...
आरक्षण देण्याची राज्यकर्त्यांची इच्छाच...पुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्याची राजकीय...
नांदेडमध्ये थकीत ‘एफआरपी’साठी धरणेनांदेड : ऊस गाळप होऊनही पैसे न दिल्याने...