फळगळ विषयक ‘त्या’ संदेशापासून राहा सावध

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या नावाचा उपयोग करीत सोशल मीडियावर फळगळ नियंत्रण विषयक चुकीचा संदेश प्रसारित करण्यात येत आहे. या माध्यमातून संत्रा बागायतदारांची फसवणूक होण्याची शक्‍यता लक्षात घेता हा प्रकार गांभीर्याने घेत याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा संस्थेकडून देण्यात आला आहे.
Beware of 'that' message about fruit
Beware of 'that' message about fruit

नागपूर ः केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या नावाचा उपयोग करीत सोशल मीडियावर फळगळ नियंत्रण विषयक चुकीचा संदेश प्रसारित करण्यात येत आहे. या माध्यमातून संत्रा बागायतदारांची फसवणूक होण्याची शक्‍यता लक्षात घेता हा प्रकार गांभीर्याने घेत याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा संस्थेकडून देण्यात आला आहे. 

विदर्भात सुमारे एक लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. पावसाची संततधार तसेच ढगाळ वातावरण कायम असल्याने संत्रा बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत मोठ्या प्रमाणावर फळगळीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. संशोधक संस्थांनी या विषयी कोणत्याच शिफारशी न केल्याचा आरोप संत्रा बागायतदारांचा असून यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष देखील अनुभवता येतो. त्याची दखल घेत केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेकडून संत्रापट्टयात कार्यशाळा, प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे.या माध्यमातून संत्रा बागायतदारांना फळगळ नियंत्रणाची तांत्रिक माहिती दिली जाते. संस्थेचे तज्ज्ञ थेट बांधावर पोचून मार्गदर्शन करीत आहेत. 

कृषी विद्यापीठाकडून देखील राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत फळगळ विषयक कार्यशाळा पार पडली. केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने आपल्या संकेतस्थळावर देखील याविषयीची माहिती उपलब्ध करून दिली आहे. मात्र, असे असतानाच काहींनी मात्र संस्थेच्या नावाचा उपयोग करीत सोशल मीडियावर फळगळ नियंत्रणविषयक बनावट संदेश प्रसारित केला आहे.

कायदेशीर कारवाईची चाचपणी या बनावट संदेशाचा आणि संस्थेचा कोणताही संबंध नसल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी दिली असून शेतकऱ्यांनी अशा बनावट संदेशापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाईची चाचपणी देखील संस्थेकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com