Agriculture news in Marathi Beware of 'that' message about fruit | Page 3 ||| Agrowon

फळगळ विषयक ‘त्या’ संदेशापासून राहा सावध

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 सप्टेंबर 2021

केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या नावाचा उपयोग करीत सोशल मीडियावर फळगळ नियंत्रण विषयक चुकीचा संदेश प्रसारित करण्यात येत आहे. या माध्यमातून संत्रा बागायतदारांची फसवणूक होण्याची शक्‍यता लक्षात घेता हा प्रकार गांभीर्याने घेत याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा संस्थेकडून देण्यात आला आहे. 

नागपूर ः केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेच्या नावाचा उपयोग करीत सोशल मीडियावर फळगळ नियंत्रण विषयक चुकीचा संदेश प्रसारित करण्यात येत आहे. या माध्यमातून संत्रा बागायतदारांची फसवणूक होण्याची शक्‍यता लक्षात घेता हा प्रकार गांभीर्याने घेत याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा संस्थेकडून देण्यात आला आहे. 

विदर्भात सुमारे एक लाख हेक्‍टरवर संत्रा लागवड आहे. पावसाची संततधार तसेच ढगाळ वातावरण कायम असल्याने संत्रा बागांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत मोठ्या प्रमाणावर फळगळीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. संशोधक संस्थांनी या विषयी कोणत्याच शिफारशी न केल्याचा आरोप संत्रा बागायतदारांचा असून यामुळे त्यांच्यामध्ये असंतोष देखील अनुभवता येतो. त्याची दखल घेत केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेकडून संत्रापट्टयात कार्यशाळा, प्रशिक्षणावर भर देण्यात आला आहे.या माध्यमातून संत्रा बागायतदारांना फळगळ नियंत्रणाची तांत्रिक माहिती दिली जाते. संस्थेचे तज्ज्ञ थेट बांधावर पोचून मार्गदर्शन करीत आहेत. 

कृषी विद्यापीठाकडून देखील राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत फळगळ विषयक कार्यशाळा पार पडली. केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेने आपल्या संकेतस्थळावर देखील याविषयीची माहिती उपलब्ध करून दिली आहे. मात्र, असे असतानाच काहींनी मात्र संस्थेच्या नावाचा उपयोग करीत सोशल मीडियावर फळगळ नियंत्रणविषयक बनावट संदेश प्रसारित केला आहे.

कायदेशीर कारवाईची चाचपणी
या बनावट संदेशाचा आणि संस्थेचा कोणताही संबंध नसल्याची माहिती संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी दिली असून शेतकऱ्यांनी अशा बनावट संदेशापासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी कायदेशीर कारवाईची चाचपणी देखील संस्थेकडून सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


इतर अॅग्रो विशेष
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीचा...
फळे- भाजीपाला साठवणुकीसाठी ‘पुसा फार्म...नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेने (...
पुण्यात ‘महाराष्ट्र बंद’ला प्रतिसादपुणे - उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे...
हत्याकांडाचा ‘कडकडीत’ निषेधपुणे ः लखीमपूर खिरीमध्ये भाजपा मंत्रिपुत्राच्या...
कापसाचे दर राहतील ७००० रुपयांच्या पुढे...नागपूर ः जागतिक बाजारात १९९४ व २०११ नंतर...
राज्यात पावसाची उघडीप शक्यपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) परतीचा...
कोल्हापूर, सांगली, कोकणात बंदला संमिश्र...कोल्हापूर : लखीमपूर येथील शेतकऱ्यांना...
मॉन्सून महाराष्ट्रातून परतण्यास प्रारंभपुणे : राजस्थानातून ६ ऑक्टोबर रोजी परतीची वाटचाल...
ऊस वाहतूक नियमावली रद्द केल्याने नाराजीपुणे ः राज्यातील उसाची तोडणी व वाहतुकीच्या...
पीकविमा कामकाजात हलगर्जीपणा नाहीपुणे ः पीकविमा योजनेतील मध्य हंगाम प्रतिकूल...
ऊसतोडीसाठी पैसे मागितल्यास तक्रार करा...पुणे ः ऊसतोडणीसाठी पैशांची मागणी होत असल्यास...
निर्यातक्षम डाळिंब उत्पादनात देशमुख...सुलतानपूर (जि. नगर) येथील विजय देशमुख यांनी नऊ...
दुग्ध व्यवसायातून बसविली आर्थिक घडीसातारा जिल्ह्यात कोपर्डे (हवेली) येथील कैलास...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाजपुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) परतीचा...
कोकण, मराठवाड्यात पावसाचा दणकापुणे : मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला वेग आला...
चार कोटी ‘सातबारा’चे होणार मोफत वाटपपुणे ः ‘‘शेतकऱ्यांचा सातबारा तुम्ही विविध बदलांसह...
‘एफआरपी’ देण्यात महाराष्ट्र देशात अव्वलकोल्हापूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ‘एफआरपी’...
कमी दराने साखर विक्री अंगलट येण्याची...कोल्हापूर : राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात...
हिंसाचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र...पुणे ः उत्तर प्रदेशातील लखिमपूर येथील शेतकरी...
निर्यातीकरिता रेल्वेने प्राधान्य द्यावेनागपूर ः संत्रा उत्पादकांसाठी कमी वेळेत आणि कमी...