agriculture news in marathi, BG-2 technology cant be restricted, ICAR | Agrowon

‘बीजी-२’ तंत्रज्ञानाच्या वापरावर निर्बंध नाहीच
विनोद इंगोले
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

राज्य सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का
नागपूर : ‘बीजी-२’ तंत्रज्ञान असलेले कापूस वाणदेखील गुलाबी बोंडअळीला बळी पडल्याने त्याची मान्यता रद्द करावी, यासाठी पाठपुरावा करणाऱ्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्‍का बसला. भारतीय कृषी संशोधन परिषदेने दिल्लीत घेतलेल्या बैठकीत ‘बीजी-२’ तंत्रज्ञानावर आधारित कापूस वाणांचा वापर पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

राज्य सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्का
नागपूर : ‘बीजी-२’ तंत्रज्ञान असलेले कापूस वाणदेखील गुलाबी बोंडअळीला बळी पडल्याने त्याची मान्यता रद्द करावी, यासाठी पाठपुरावा करणाऱ्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना मोठा धक्‍का बसला. भारतीय कृषी संशोधन परिषदेने दिल्लीत घेतलेल्या बैठकीत ‘बीजी-२’ तंत्रज्ञानावर आधारित कापूस वाणांचा वापर पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

महाराष्ट्रात या वर्षी सातशे गावांमध्ये ‘बीजी-२’ कापूस वाणावर तंत्रज्ञानावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला आहे. याची तीव्रता वाढल्याने ‘बीजी-२’  तंत्रज्ञान ‘डिनोटीफाय’ करण्याची मागणी राज्याचे कृषी सचिव बिजयकुमार यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर २५ ऑक्‍टोंबर रोजी कृषी भवन दिल्ली येथे भारतीय कृषी संशोधन परिषदेचे उपसंचालक (पीक संरक्षण) यांच्या अध्यक्षतेत बैठक झाली. कृषी आयुक्‍त सचिंद्र प्रतापसिंह यांच्यासह कापूस तज्ज्ञ, कापूस उत्पादक राज्याचे संशोधन संचालक, तसेच नॅशनल सीड असोसिएशनचे प्रतिनिधी बैठकीला होते. कृषी आयुक्‍त सिंग यांनी बीटी पाकिटांसोबत देण्यात आलेले रिफ्युजी बियाणे दर्जाहीन असल्याचे सांगीतले. त्यासोबतच काही शेतकरी रेफ्युजी बियाण्याचा वापर करीत नसल्याची बाबदेखील त्यांनी मान्य केली. 

नॅशनल सीड असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर राव म्हणाले की, बीजी- २ कपाशी सर्व प्रकारच्या बोंडअळ्यांना प्रतिकारक असल्याचे सांगितले जात होते, परंतु आता बीजी-१ प्रमाणेच बीजी-२ कपाशी वाणाची अवस्था झाली आहे. त्यामुळे बीजी-२ तंत्रज्ञानाच्या वापराबाबत पुनर्विचाराची मागणी त्यांनी केली. नॅशनल सीड असोसिएशनचे कार्यकारी संचालक डॉ. कल्याण गोस्वामी यांनीही या वाणाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी केली. बैठकीत तज्ज्ञांनी मात्र कापसाकरिता दुसरे पर्यायी तंत्रज्ञान सध्यातरी उपलब्ध नसल्याचे सांगत बीजी-२ वाणाचा वापर पूर्ववत सुरू करण्याची सूचना केली. त्यानुसार पूर्वीच्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणेच बीजी-२ वाणांचा वापर करण्याचा निर्णय बैठकीत झाला.

तंत्रज्ञान डिनोटीफाय कसे करता येईल? 
बीटी कापूस विषयातील एक तज्ज्ञ या विषयावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, ‘बीजी-२’ हे मुळात जनुकीय तंत्रज्ञान आहे. एखादे तंत्रज्ञान ‘डिनोटीफाय’ करता येत नाही. मुळात सर्व चाचण्यांअंती त्याच्या वापरास संमती मिळाली आहे, तसेच महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांनी कपाशीच्या ‘बीजी-२’  वाणांच्या वापराला विरोध केलेला नाही. हे तंत्रज्ञान आपल्या जरुरीचे असल्याचे या राज्यांचे म्हणणे आहे. 

पर्याय शोधणे गरजेचे 
नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉ. व्ही. एन. वाघमारे म्हणाले, की एखादे तंत्रज्ञान प्रभावी ठरत नसेल, तर त्यावर पर्याय शोधणे हेच गरजेचे आहे, तसेच एखादी बाब ‘डिनोटीफाय’ करणे म्हणजे त्याच वापर थांबवणे असा होतो. मात्र त्याची सक्ती करता येत नाही. उदाहरण सांगायचे तर एखादे जुने वाण ‘डिनोटीफाय’ केले जाते. मात्र एखाद्याला त्याचा वापर करायचा असला तर तो करू शकतो. 

बीजी-१ कपाशी वाणाचा वापर आता केला जात नाही. त्यामुळे त्याच्या पेटंटपोटी पाकिटामागे ४९ रुपये मोन्सॅटोला कंपनीला द्यावे लागत नाही. त्याच धर्तीवर बीजी-२ कपाशी तंत्रज्ञानाचा वापरही थांबवण्याची गरज आहे. या तंत्रज्ञानात दोन जनुके असली तरी त्यांचा उपयोग होताना दिसत नाही.
- प्रभाकर राव, अध्यक्ष, नॅशनल सीड असोसिएशन ऑफ इंडिया, दिल्ली.

इतर अॅग्रो विशेष
शेळीपालन ते दुग्ध प्रक्रिया ः महिलांनी...नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा अवर्षणप्रवणग्रस्त...
सरकारला एवढी कसली घाई?विविध मंत्रालयांसाठी अर्थसंकल्पात केल्या जाणाऱ्या...
एक पाऊल पोषणक्रांतीच्या दिशेनेशे तकऱ्यांचे कष्ट, शास्त्रज्ञांचे प्रयत्न आणि...
आधुनिक तंत्रासह काटेकोर धोरणाने अमेरिकन...पुणेः विविध जागतिक संस्थांनी एकत्र येऊन आफ्रिकी,...
मक्याच्या तुटवड्यामुळे अंडी आणि चिकन...पुणे : दक्षिण भारतासह महाराष्ट्र व मध्य प्रदेशात...
लष्करी अळीमुळे राज्यभरातील शेतकरी त्रस्तपुणेः गेल्या वर्षी भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या...
लष्करी अळी नियंत्रणाचे जागतिक प्रयत्नपुणे : स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा म्हणजेच...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे आव्हान...पुणे ः गेल्या हंगामातील दुष्काळाच्या चटक्यानंतर...
राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाजपुणे : मॉन्सून पुन्हा सक्रिय झाल्याने राज्यात...
शेतकरी कंपन्या स्थापन करण्यासाठी करारपुणे ः नाबार्डच्या कंपनी विकास फंडातून...
कर्नाटकात गुऱ्हाळघरातून थेट व्यापार...सांगली ः कर्नाटकमध्ये हमाली आणि अडत कमी असल्याने...
पीकविम्याचे ३२५ कोटी कंपन्यांना वितरितमुंबई ः गेल्यावर्षीच्या खरिपातील पीकविमा योजनेचा...
ग्रामविकासावर खर्च झालेल्या निधीची...मुंबई: आपल्या ग्रामपंचायतीला गावातील...
दुष्काळातही कडवंचीत शेतीतून ७२ कोटींचे...जालना : ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक...
राज्यात सहामाहित तेराशे शेतकऱ्यांची...मुंबई ः सततची दुष्काळी स्थिती, नैसर्गिक संकटे,...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : मॉन्सून पुन्हा सक्रीय झाल्याने...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...