‘बीजी २’ कपाशीचे दर ४३ रुपयांनी वाढविले

औरंगाबाद : बियाणे उत्पादन, संशोधन व इतर कार्यावर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत बियाणे पाकिटांचे दर असावेत, अशी आशा देशभरातील कपाशी बियाणे उत्पादक कंपन्यांना होती. त्याची दखल घेताना केंद्रीय कृषी मंत्रालयाने कपाशीच्या बीटी (बॅसिलस थुरिंजियनसिस) ‘बीजी १’ बियाणे पाकिटाची किंमत गतवर्षी इतकीच ठेवली आहे. तर ‘बीजी २’ बियाणे पाकिटाच्या किमतीत मात्र केवळ ४३ रुपयांनी वाढविली आहे. तशी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.
BG2 cotton price hiked by Rs 43
BG2 cotton price hiked by Rs 43

औरंगाबाद : बियाणे उत्पादन, संशोधन व इतर कार्यावर होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत बियाणे पाकिटांचे दर असावेत, अशी आशा देशभरातील कपाशी बियाणे उत्पादक कंपन्यांना होती. त्याची दखल घेताना केंद्रीय कृषी मंत्रालयाने कपाशीच्या बीटी (बॅसिलस थुरिंजियनसिस) ‘बीजी १’ बियाणे पाकिटाची किंमत गतवर्षी इतकीच ठेवली आहे. तर ‘बीजी २’ बियाणे पाकिटाच्या किमतीत मात्र केवळ ४३ रुपयांनी वाढविली आहे. तशी अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे.  गुणवत्तापूर्ण व उत्पादनक्षम बियाणे मिळावे ही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. त्यावर खरे उतरण्यासाठी बियाणे उत्पादक कंपन्यांकडून प्रयत्न केले जातात. देशभरात जवळपास शंभरपेक्षा जास्त कपाशी बियाणे उत्पादक कंपन्या आहेत. त्यांच्याकडून देशभरातील कपाशी उत्पादकांच्या अपेक्षेवर खरे उतरण्यासाठी बियाणे संशोधन व उत्पादन केले जाते. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर बियाणे उत्पादनाची प्रात्यक्षिके व संशोधन प्रकल्पावर संशोधन केले जाते. 

एकीकडे कापसाचे दर वाढले, उत्पादन खर्च वाढला, संशोधनावर होणाऱ्या खर्चातही वाढ झाली. त्यामुळे बीटी कपाशीच्या बियाणे पाकीट दरातही उत्पादन खर्चाच्या तुलनेत वाढ केली जावी, अशी अपेक्षा देशभरातील कपाशी बियाणे उत्पादक उद्योगाला होती. या अपेक्षेचा विचार करताना केंद्रीय कृषी मंत्रालयाने कपाशीच्या बीटी कपाशीच्या ‘बीजी-१’चे दर गतवर्षीप्रमाणेच प्रतिपाकीट ६३५ ठेवले आहेत. तर लागवडीसाठी प्रत्यक्षात वापरल्या जाणाऱ्या व मोठ्या प्रमाणात बियाणे उत्पादित केल्या जाणाऱ्या ‘बीजी-२’ कपाशी बियाणे पाकिटाचे दर गतवर्षी जे ७६७ रुपये प्रतिपाकीट होते, ते आता ८१० रुपये प्रतिपाकीट केले आहेत त्यात एकूण ४३ रुपयांची वाढ केली आहे. 

केंद्र सरकारचे या विषयाचे संयुक्‍त सचिव अश्‍विनी कुमार यांच्या माध्यमातून तशी अधिसूचना केंद्र सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागाने १५ मार्चलाच निर्गमित केली आहे. २०२२-२३ साठी बीटी कपाशीच्या बियाणे पाकिटांसाठी हे दर लागू असतील. 

गत तीन वर्षांत पहिल्यांदा केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने बीटी कपाशी ‘बीजी-२’ बियाणे पाकिटांच्या किमतीत किंचितशी वाढ केली आहे. महाराष्ट्रात कपाशीचे सरासरी क्षेत्र ४० लाख हेक्‍टर आहे. दरवर्षी देशात बीटी कपाशीच्या जवळपास साडेतीन ते चार कोटी बियाणे पाकिटांची गरज असते. त्यापैकी जवळपास दीड कोटी बियाणे पाकीट महाराष्र्टालाच लागतात हे विशेष.

एकीकडे कापसाचे दर वाढले, बियाणे उत्पादन खर्च व संशोधन खर्च वाढला आहे. संशोधन खर्चावर येणाऱ्या मर्यादा व बियाणे उत्पादन खर्चाचा न बसणारा ताळमेळ पाहता उत्पादन खर्चाच्या तुलनेत बीटी कपाशी बियाणे पाकिटांचे दर वाढण्याची अपेक्षा उद्योगाला होती. त्यामुळे यंदासाठी झालेली किंचित वाढ समाधान देणारी म्हणता येणार नाही. - सतीश कागलीवाल, अध्यक्ष, सियाम.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com