महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगतसिंग कोशियारी

महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगतसिंग कोशियारी
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी भगतसिंग कोशियारी

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह पाच राज्यांच्या राज्यपालांच्या नेमणुकीची घोषणा राष्ट्रपती भवनातर्फे आज जाहीर करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्राच्या राज्यपालपदी उत्तराखंडमधील वरिष्ठ भाजपनेते आणि त्या राज्याचे माजी मुख्यमंत्री भगतसिंग कोशियारी यांना नेमण्यात आले आहे. वर्तमान राज्यपाल विद्यासागर राव यांची पाच वर्षांची मुदत पूर्ण झाल्यानंतर आता कोशियारी त्यांची जागा घेतील. कोशियारी (वय ७७) हे रा.स्व. संघात होते व त्या संघटनेत काम केल्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तराखंडची स्थापना झाल्यानंतर या राज्याचे ते दुसरे मुख्यमंत्री झाले. परंतु त्यांची कारकीर्द केवळ वर्षभराचीच राहिली. त्यानंतर ते एकदा राज्यसभचे व त्यानंतर २०१४ ते २०१९ या काळात ते लोकसभेचे सदस्य होते. भाजपच्या ७५ वर्षे राजकारण वयोमर्यादेच्या नियमानुसार त्यांना २०१९मध्ये उमेदवारी मिळाली नाही. आता त्यांना राज्यपाल करण्यात आले व महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आली. भाजपचे अन्य एक वरिष्ठ नेते व पंच्याहत्तरी पार केलेल्या कलराज मिश्र यांची हिमाचल प्रदेशातून राजस्थानात बदली करण्यात आली आहे. कलराज मिश्र हेही २०१९ पर्यंतच्या मोदी-१ सरकारमध्ये मंत्री होते. याच काळात त्यांचे सहकारी राहिलेले आंध्र-तेलंगणातील भाजपचे वरिष्ठ नेते बंडारू दत्तात्रेय यांना हिमचाल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तमिळनाडूतील भाजपनेते तमीळसाई सुंदरराजन यांना शेजारी राज्य तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आले आहे. स्लम सुधारणावादी नेते आणि तोंडी तलाकप्रथेच्या विरोधात सतत आवाज उठविणारे नेते अरिफ महंमद खान यांना केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. केरळमधील राजकारणाच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जाते. खान हे सक्रिय राजकीय नेते असल्याने ते एक सक्रिय राज्यपाल राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com