Agriculture news in marathi Bhandara burning case report to the government | Page 2 ||| Agrowon

भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 जानेवारी 2021

भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू कक्षाला लागलेल्या आगीत दहा शिशूंचा मृत्यू झाला होता. या घटनेला अकरा दिवस उलटून गेले आहेत. प्राथमिक चौकशी अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू कक्षाला लागलेल्या आगीत दहा शिशूंचा मृत्यू झाला होता. या घटनेला अकरा दिवस उलटून गेले आहेत. प्राथमिक चौकशी अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ही दुर्घटना शॉर्टसर्किटमुळे घडल्याचे अहवालात नमूद असल्याची दाट शक्यता आहे. मात्र, घटनेतील दोषींवर अद्याप निलंबनाची कारवाई झाली नाही. बाळ गमावलेल्या दुर्दैवी माता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कारवाईचा फास आवळण्यास उशीर का होत आहे, असा प्रश्‍न विचारला जात आहे. 

नवजात शिशूंचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या या प्रकरणात प्राथमिक जबाबदारी असलेले जिल्हा शल्यचिकित्सक, रात्रपाळीत कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई होणे अपेक्षित होते.

कारवाईनंतर चौकशी करण्यात येईल, अशी अपेक्षा या सरकारकडून होती. मात्र, तसे झाले नाही. अहवाल सादर झाल्यानंतर ज्या संबंधितांवर ठपका ठेवण्यात आला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. कारवाईला उशीर का होत आहे, हेच कळायला मार्ग नाही. अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तत्काळ चौकशी समिती तयार करण्यात आली.

मात्र, कारवाईला विलंब होत असल्याने या प्रकरणातील गंभीरता कमी होत आहे. चौकशी समितीकडून दोषींवरील कारवाई पेक्षा उपाययोजना सांगण्यावर भर देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

मातांचा आक्रोश 
आठ जानेवारीला मध्यरात्रीनंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ही घटना घडली होती. एकाच वेळी दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर मातांनी मोठा आक्रोश केला होता. मातांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्या मातांचे सांत्वन करण्यासाठी सारे सरकार तेथे आले, मात्र अद्याप या बाळ गमावलेल्या दुर्दैवी माता न्यायापासून वंचित आहेत. जणूकाही घडलेच नाही, असे चित्र येथे आहे. 

आठ जानेवारीला मध्यरात्रीनंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ही घटना घडली होती. एकाच वेळी दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर मातांनी मोठा आक्रोश केला होता. मातांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्या मातांचे सांत्वन करण्यासाठी सारे सरकार तेथे आले, मात्र अद्याप या बाळ गमावलेल्या दुर्दैवी माता न्यायापासून वंचित आहेत. जणूकाही घडलेच नाही, असे चित्र येथे आहे. 


इतर ताज्या घडामोडी
अवैध बोअरवेलप्रकरणी प्रशासनाकडून कारवाईअमरावती ः ड्रायझोन जाहीर करण्यात आल्याने मोर्शी,...
खानदेशात कांद्याच्या दरातील घसरण सुरूचजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या...
काजू बी १५० रुपये हमीभावाने खरेदी करावीरत्नागिरी ः काजू बी ला महाराष्ट्र सरकारने १५०...
जळगाव जिल्ह्यात गहू, हरभरा काढणीस वेगतांदलवाडी, जि. जळगाव :  सध्या गहू व हरभरा...
‘गोकुळ’बाबत मुंबईत खलबतेकोल्हापूर : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ)...
जवस पिकाकडे वळा : डॉ. झाडे औरंगाबाद : ‘‘एकरी लागवड खर्च ५ ते ६ हजार करून २५-...
वाशीममध्ये कोरोना रोखण्यासाठी सरपंच...वाशीम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा...
‘विष्णुपुरी’च्या पाण्याबाबत कार्यवाही...नांदेड : ‘‘विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभ...
कलंबरमध्ये महिला शेतीशाळेस प्रतिसादनांदेड : लोहा तालुका कृषी विभागाच्या कृषी...
‘पीएम किसान’ योजनेच्या कामास तलाठ्यांचा...नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान योजनेशी संबंधित...
चाऱ्यासाठी वनशेतीमध्ये अंजन, निवडुंगदीर्घकाळ दुष्काळ सहन करण्याची अंजन या चारा...
शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बळकटीकरण महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि नाबार्डच्या...
केसर आंबा व्यवस्थापनया वर्षी आंबा झाडांना मोहोर आला. सध्या...
फ्लॉवर ‌जांभळा-गुलाबी‌ होण्याची समस्याआनुवांशिकदृष्ट्या‌,‌ फ्लॉवर ‌पांढऱ्या,‌ ‌जांभळ्या...
पुणे जिल्ह्यात उन्हामुळे धरणांतील...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने धरणांतील पाण्याचा...
म्हसवड येथे शेतकरी आंदोलन सुरूचम्हसवड, जि. सातारा : शेतजमीन कब्जे वहिवाटीत...
मराठवाड्यात उपयुक्त पाणी ६५.८० टक्केचऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांतील उपयुक्त...
`हिंगोलीत केंद्रीय मसाले मंडळाचे...हिंगोली : हळदीच्या उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांना...
अवकाळीच्या नुकसानीचे नांदेडमध्ये १८...नांदेड : जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अवेळी...
शेतमाल चोरणारी टोळी जेरबंद अमरावती : कोरोनामुळे ग्रामीण भागात निर्माण...