शेतकरी सन्मान निधी योजनेच्या दोन वर्षपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या
बातम्या
भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू कक्षाला लागलेल्या आगीत दहा शिशूंचा मृत्यू झाला होता. या घटनेला अकरा दिवस उलटून गेले आहेत. प्राथमिक चौकशी अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू कक्षाला लागलेल्या आगीत दहा शिशूंचा मृत्यू झाला होता. या घटनेला अकरा दिवस उलटून गेले आहेत. प्राथमिक चौकशी अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ही दुर्घटना शॉर्टसर्किटमुळे घडल्याचे अहवालात नमूद असल्याची दाट शक्यता आहे. मात्र, घटनेतील दोषींवर अद्याप निलंबनाची कारवाई झाली नाही. बाळ गमावलेल्या दुर्दैवी माता न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. कारवाईचा फास आवळण्यास उशीर का होत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.
नवजात शिशूंचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या या प्रकरणात प्राथमिक जबाबदारी असलेले जिल्हा शल्यचिकित्सक, रात्रपाळीत कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, परिचारिका यांच्यावर तत्काळ निलंबनाची कारवाई होणे अपेक्षित होते.
कारवाईनंतर चौकशी करण्यात येईल, अशी अपेक्षा या सरकारकडून होती. मात्र, तसे झाले नाही. अहवाल सादर झाल्यानंतर ज्या संबंधितांवर ठपका ठेवण्यात आला आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही. कारवाईला उशीर का होत आहे, हेच कळायला मार्ग नाही. अशा दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तत्काळ चौकशी समिती तयार करण्यात आली.
मात्र, कारवाईला विलंब होत असल्याने या प्रकरणातील गंभीरता कमी होत आहे. चौकशी समितीकडून दोषींवरील कारवाई पेक्षा उपाययोजना सांगण्यावर भर देण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मातांचा आक्रोश
आठ जानेवारीला मध्यरात्रीनंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात ही घटना घडली होती. एकाच वेळी दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानंतर मातांनी मोठा आक्रोश केला होता. मातांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्या मातांचे सांत्वन करण्यासाठी सारे सरकार तेथे आले, मात्र अद्याप या बाळ गमावलेल्या दुर्दैवी माता न्यायापासून वंचित आहेत. जणूकाही घडलेच नाही, असे चित्र येथे आहे.

- 1 of 1536
- ››