भंडारा जिल्ह्यात अतिपावसामुळे पिके कुजण्याची भीती

भंडारा जिल्ह्यात अतिपावसामुळे पिके कुजण्याची भीती
भंडारा जिल्ह्यात अतिपावसामुळे पिके कुजण्याची भीती

भंडारा ः लाखनी तालुक्‍यात या वर्षी २८ सप्टेंबरपर्यंत १४५३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. वार्षिक सरासरीच्या अधिक पाऊस झाल्याने लाखनी तालुक्‍यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. जास्तीच्या पावसामुळे धानावर कीड-रोगाचा प्रादुर्भावदेखील वाढीस लागला आहे. त्यासोबतच धानबाधित पाणी साचून असल्याने त्यामुळे पीक कुजण्याची देखील भीती वर्तविली जात आहे. 

लाखनी तालुक्‍यात २२ हजार २०९ हेक्‍टरवर धानाची लागवड आहे. परंतु अतिरिक्‍त पावसामुळे हे पीक हातचे जाण्याची शक्‍यता वाढीस लागली आहे. तालुक्‍यात १ जून ते २८ सप्टेंबर या कालावधीत १४५३ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली. 

मागील वर्षी याच कालावधीत १०५५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे सरासरी आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत देखील जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. तालुक्‍यात २९ सप्टेंबर ८.८ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली. या वर्षी सुरवातीला पावसाने उघडीप दिली. त्यानंतर सततच्या पावसात रोवणीचे काम पूर्णत्वास गेले. त्यानंतर तण काढण्याचे कामही शेतकऱ्यांद्वारे झाले. परंतु आता संततधार पावसामुळे पिकावर कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. 

हलक्‍या प्रतीच्या धानाचे पावसाने अधिक नुकसान झाले आहे. धानाच्या लोंबाना कीड लागली आहे, तर काही भागात धानपीक शेतात पडले आहे. शेतातून पाण्याचा निचरा होत नसल्याने अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. पाऊस न थांबल्याने काही भागात धान पीक सडायला देखील सुरवात झाली आहे.  या साऱ्याची दखल घेत शेतकऱ्यांची भरपाईची मागणी होत आहे.

असा आहे मंडळनिहाय पाऊस (चौकटीत गेल्या वर्षीचा पाऊस) 
लाखनी १४६२.१ (१०५५.१)
पोहरा  १०७०.९ (८९७.३)
पालांदूर  १२८५.६  (११०६.६)
पिंपळगाव सडक  ११७२.५ (८४०.२)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com