Agriculture news in Marathi Bhandara jilha Bank to issue crop loan from April 15 | Agrowon

भंडारा बॅंक देणार १५ एप्रिलपासून पीककर्ज 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 एप्रिल 2020

भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर पीककर्ज परताव्यास मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवार (ता. १५) पासून नवीन पीककर्ज दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली. 

भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर पीककर्ज परताव्यास मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे ३१ मार्चपर्यंत पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना बुधवार (ता. १५) पासून नवीन पीककर्ज दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी दिली. 

‘कोरोना’विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वदूर लॉकडाऊन घोषित केले आहे. अशा स्थितीतही अनेक शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करण्यासाठी पुढाकार घेतला. आता कर्ज परतफेडीस मुदतवाढ मिळाली आहे. व्याज सवलत योजनेचा फायदा त्या अंतर्गंत शेतकऱ्यांना मिळणार आहे. असे असले तरी ३१ मार्चपर्यंत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज देण्यात येणार आहे. 

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या विविध सहकारी संस्थांनी ३१ मार्चपर्यंतच्या जमाखर्चाचे ताळेबंद हिशेब शुक्रवार (ता. १०) पर्यंत बॅंकेच्या मुख्यालयी पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याआधारे शेतकऱ्यांना तातडीने येत्या खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उशिराने ताळेबंद पाठविल्यास त्या संस्थांना रक्‍कमेचे वाटप उशिरा होईल. 

शेतकऱ्यांना अडचणींचा सामना यामुळे करावा लागेल. त्याची दखल घेत संस्थाध्यक्ष सचिवांनी वेळेत आपला ताळेबंद सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत. अशावेळी दिलासा देण्याकरिता बॅंकेने पीककर्ज वाटपाचे नियोजन केले आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात दमदार पाऊस सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
नगर जिह्यात पावसाने पिकांचे अतोनात...नगर  : जिल्ह्याच्या बहुतांश भागात...
सोनी गावामध्ये आहेत २८८ शेततळीसोनी (ता. मिरज,जि.सांगली) या गावात  कृषी...
कर्नाळा बँकेत ३६ ग्रामपंचायतींचे पैसे...मुंबई : ‘शेकाप’चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या...
मराठवाड्याच्या विकासासाठी शासन कटीबध्द...औरंगाबाद : मराठवाड्याच्या सर्वांगिण विकासासाठी...
केंद्राच्या कांदा निर्यातबंदी विरोधात...नाशिक : केंद्र सरकारने कुणाचीही ओरड नसताना, अन्न...
औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान...
खानदेशातील पपई पिकाला अतिपावसाचा फटकाजळगाव : खानदेशात पपई पिकाला अतिपावसाचा फटका बसला...
नांदेडमध्ये ३८ हजार हेक्टर पिकांचे...नांदेड : अतिवृष्टी व पूरामुळे जिल्ह्यातील ३८१...
‘म्हैसाळ’मधून पावणेदोन टीएमसी पाणी उचललेसांगली  ः कृष्णा नदीला आलेल्या पूराचे पाणी...
कांदा निर्यातबंदीविरूध्द कॉंग्रेसचे...रत्नागिरी : कांदा निर्यातीबाबतचा निर्णय...
मुसळधार पावसामुळे पिके भुईसपाटपुणे ः राज्यातील अनेक भागांत कमीअधिक स्वरूपात...
पानपिंपरी पिकाला विम्याचे कवच द्याअकोला ः जिल्ह्यात पानपिंपरी या वनौषधीवर्गीय...
सीमाभाग आणि बंदरातील कांदा सोडा; अन्यथा...नाशिक : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर शेजारील...
कोल्हापुरात ‘गोकूळ’चे दूध रोखण्याचा...कोल्हापूर : मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याच्या...
शरद पवार यांनी ऊसतोड कामगारांची कोंडी...नगर ः ऊसतोडणी कामगारांच्या तोडणी दरात वाढ करावी...
फळबाग लागवडीसाठी जमिनीची निवड महत्त्वाचीसामान्यपणे फळबागा अयशस्वी होण्यामध्ये किंवा...
बियाणासाठी घरचे सोयाबीन ठेवताना...बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये...
महिला बचत गटांच्या माध्यमातून हळद...सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर...
पुणे जिल्ह्यात दोन लाखावर शेतकऱ्यांना...पुणे : जिल्हा बॅंकेकडून खरीप हंगामासाठी गेल्या...