Agriculture news in Marathi Bhandara Zilla Parishad will implement a scheme for cattle breeders | Agrowon

भंडारा जिल्हा परिषद पशुपालकांसाठी राबविणार योजना

टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 जुलै 2020

भंडारा : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२०-२१ या वर्षात पशुपालकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून त्यासाठी अर्जदाराकडून २० जुलै २०२० पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनांचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा यांनी केले आहे.

भंडारा : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२०-२१ या वर्षात पशुपालकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून त्यासाठी अर्जदाराकडून २० जुलै २०२० पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनांचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद भंडारा यांनी केले आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थ्यांकरिता विशेष घटक योजनेअंतर्गत २ दुधाळ जनावरांचे ७५ टक्के अनुदानावर गट पुरवठा व अनुसूचित जाती व नवबौद्ध लाभार्थींच्या दुभत्या जनावरांना १०० टक्के अनुदानावर खाद्य पुरवठा करणे या बाबतच्या योजना आहेत.

अनुसूचित जमातीकरिता आदिवासी उपयोजनेअंतर्गत २ दुधाळ जनावरांचा ७५ अनुदानावर एक दिवसीय सुधारित कुक्कुट पक्ष्यांचे गट पुरवठा करण्यात येते. त्याचप्रमाणे आदिवासी लाभार्थींच्या दुभत्या जनावरांना १०० टक्के अनुदानावर खाद्य पुरवठा करण्यात येते व शेळ्या व मेंढ्यांचा गट पुरवठा अंतर्गत ७५ टक्के अनुदानावर गट पुरवठा केला जातो.

सर्वसाधारण व अन्य लाभार्थींसाठी एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रमांतर्गत ५० टक्के अनुदानावर एकदिवसीय सुधारित कुक्कुट पक्ष्यांचे गट वाटप करावयोच आहे. तसेच वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रमाअंतर्गत सर्वसाधारण व अन्य लाभार्थ्यांसाठी १०० टक्के अनुदानावर १५०० रुपयांच्या मर्यादेत वैरण बियाणे व ठोंबे पुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हा निधी योजना सर्वसाधारण योजनेअंतर्गत पशुपालकांसाठी ५० टक्के अनुदानावर शेळी प्रजननासाठी उत्तम प्रतीचा बोकड वाटप ही योजना आहे. सर्व योजनेसाठी पंचायत समिती अंतर्गत पशुधन विकास अधिकारी यांचे मार्फत इच्छुक लाभार्थ्यांकडून २० जुलै २०२० पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.

ज्यांनी योजनेचा यापूर्वी लाभ घेतलेला आहे. अशा पशुपालकांचे अर्ज या वर्षी निवड प्रक्रियेमध्ये घेतले जाणार नाही. जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी तसेच इच्छुक लाभार्थ्यांनी व जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पंचायत समितीत विहित मुदतीत अर्ज सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर बाजार समिती नोकर भरतीविरोधात...कोल्हापूर: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नगर : मक्‍याला हमीभावापेक्षा कमी दर...नगर ः रब्बी हंगामामध्ये शासनाच्या किमान आधारभूत...
सातारा जिल्ह्यात खरिपाच्या ८२.८५ टक्के...सातारा  ः पावसाचा काहीसा जोर वाढल्याने...
पुणे बाजार समितीसह उपबाजार ...पुणे  ः ‘कोरोना’च्या फैलावामुळे शहरातील...
नगर जिल्ह्यात एक लाख १७ हजार हेक्टरवर...नगर  ः जिल्ह्यात यंदा जुलैच्या पहिल्याच...
अमरावतीत बियाणे कंपनीकडून ९०१ बॅग, २२...अमरावती : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत १...
कोविड-१९ रुग्णांच्या वास, चव संवेदनांवर...कोविड १९ च्या आजारातून बरे झाल्यानंतरही सुमारे ९०...
खानदेशात दुबार पेरणीसाठी ताग, बाजरी,...जळगाव  ः खानदेशात दुबार पेरणी आटोपली आहे....
जळगावमधील सिंचन प्रकल्पांची कामे...जळगाव  ः जिल्ह्यात तापी व गिरणा नदीवर...
निकृष्ट बियाणेप्रकरणी सर्व कंपन्यांवर...नगर: जिल्ह्यात गेल्या एक महिन्याच्या कालावधीत...
बॅंकांनी पीककर्ज प्रकरणे तत्काळ मार्गी...वर्धा  ः जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांपैकी एकही...
गोंदिया जिल्ह्यात युरियाची टंचाईगोंदिया  ः पावसामुळे धान रोवणीला वेग आल्याने...
औरंगाबाद जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरळीत...औरंगाबाद : जिल्ह्यात ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
अकोल्यात तूर सरासरी ५८०० रुपये क्विंटलअकोला  ः  येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्ह्यातील तीन केंद्रांवर २०२३...सांगली  ः जिल्ह्यात हमीभावाने मका खरेदीसाठी...
रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी पिकासाठी...रत्नागिरी  : रत्नागिरी जिल्ह्यात भात, नाचणी...
आरोग्यदायी दालचिनीमसाल्यांच्या पदार्थांत, घरात मसाला करताना...
कोकण, कोल्हापूर पट्ट्यात मुसळधार...कोकण व कोल्हापूर भागावर १००२ तर महाराष्ट्रावर...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...