चाळीस वर्षांत ३१ वेळा भरले भंडारदरा धरण

भंडारदरा धरण
भंडारदरा धरण

नगर ः नगर जिल्ह्यामधील उत्तर भागाला वरदान असलेल्या आणि राज्याचे लक्ष असलेले भंडारदरा धरण आत्तापर्यंत ४० वर्षांपैकी ३१ वेळा भरले आहे. त्यात १५ ऑगस्टच्या आतमध्ये पाचव्यांदा भरले आहे. निळवंडे धरण मात्र आत्तापर्यंत पाणी साठवायला लागल्यापासून दोन वेळा भरले आहे. यंदा भंडारदरातून दरवर्षीच्या तुलनेत दहा दिवस आधीच पाणी सोडले असल्याने व पाण्याची जोरदार आवक असल्याने धरण भरून पाणी जायकवाडीकडे जाणार आहे. मराठवाड्यातील लोकांच्याही आशा आता वाढल्या आहेत.  नगर जिल्ह्यामधील आदीवासी पट्टा असलेल्या पश्चिम भागातील अकोले तालुक्यात असलेल्या भंडारदरा धरणाची निर्मिती इंग्रज सरकारने केली आहे. १९१० मध्ये कामाला सुरवात झाली. १९२६ ला काम पूर्ण झाले. शेंडी गावाजवळ दोन डोंगरांच्या मधून वाहणारी प्रवरा नदी अडवून गूळ-चुना व दगडाचे बांधकाम असलेल्या या धरणात १९२२ पासूनच पाणी अडवायला सुरवात झाली. तब्बल १२१ चौरस किलोमीटरच्या पाणलोटातून धरणात पाणी येते. ११ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेचे हे भंडारदरा धरण तसे दरवर्षी काही अपवाद वगळता जोरदार पावसामुळे ऑगस्टमध्येच भरते.  भंडारदरा धरण्याच्या वरील बाजूला कळसूबाई, साम्रदची दरी, घाटघरचा कोकणकडा, रतनवाडीचे काताळशिल्प अमृतेश्वर, मोटाचा डोंगर, अलंग-मलंग-कुलंग कडे, पांजरे, उडदावणे, मुतखेल येथील धबधबे, हरिचंद्रगड आदीसह डोंगररांगातील उंचे कडे आणि त्यावर कोसळणारा पाऊस यामुळे अकोल तालुक्यातील पश्चिम भागात जलोत्सव सुरू असतो. भंडारदरा धरण भरल्याने हा जलोत्सव पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढली आहे.  भंडारदरातून सोडलले पाणी निळवंडेत येते. ८ हजार ३२० दशलक्ष घनफूट क्षमतेचे निळवंडेत २००८ पासून पाणी साठवायला सुरवात झाली, मात्र आत्तापर्यंत केवळ २०१६ व २०१७ मध्येच पूर्ण क्षमतेने भरले आहे. मुळात धरण २०१६ मध्ये भरले होते. यंदा हरिचंद्रगडाच्या पट्ट्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरण भरण्याची शक्यता आहे. नाशिकमधून तर जोरदार पाणी जायकवाडीकडे सुरू आहेच, यंदा नगर जिल्ह्यामधूनही पाणी जाईल, अशी आशा निर्माण झाली आहे.  भंडारदरा १५ ऑगस्टपूर्वी धरण भरले ः १९९०, २००५, २०११, २०१८, २०१९.  भंडारदरा धरण भरले नव्हते ः १९७३, १९८५, १९८६, १९८७, १९८९, १९९५, १९९९, २०००, २०१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com