कृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’ 

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी विधेयकांना कडाडून विरोध करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने शुक्रवारी( ता. २५) देशव्यापी बंद आहे.
farmer
farmer

नगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी विधेयकांना कडाडून विरोध करण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने शुक्रवारी( ता. २५) देशव्यापी बंद आहे. त्यात भारतीय कम्‍युनिष्ठ पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. नगर जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात बंद व निषेध निदर्शने करण्यात येणार असल्याची इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव कॉ. अॅड. सुभाष लांडे व बन्सी सातपुते यांनी दिली. 

भाकपतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘केंद्र सरकारने मंजूर केलेली विधेयके ही शेतकरी विरोधी आहेत. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीत २०० हून अधिक शेतकरी संघटना सहभागी असून या आंदोलनात भाकप व किसान सभेचा सक्रिय सहभाग आहे. या तिन्ही विधेयक, कायद्यांमुळे पिकांची सरकारी खरेदी पूर्णपणे थांबेल आणि खासगी बाजार स्थापन होऊन शेतकऱ्यांना मिळणारा हमीभाव बंद होईल, तसेच सर्व धान्य, डाळी, तेलबिया, कांदा आणि बटाटा या वस्तू अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून काढल्या जातील. शेतकऱ्यांना किमान हमीभाव मिळत राहील. सर्व बाबीचा विचार करुन पुकारलेल्या बंदमध्ये ‘भाकप’चे कार्यकर्ते सहभागी होणार आहे. 

शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे अवाहन स्मिता पानसरे, ॲड. शांताराम वाळुंज, ॲड. आझाद ठुबे, संतोष खोडदे, ॲड. सुधीर टोकेकर, बाबा आरगडे, भैरवनाथ वाकळे, एल. एम. डांगे, आप्पासाहेब वाबळे, बापूराव राशीनकर, कारभारी ऊगले, संजय नांगरे, धोंडिभाऊ सातपूते, कानिफनाथ तांबे, सुरेश पानसरे, विकास गेरंगे, आर. डी. चौधरी, ॲड. सिताराम लांबे, बबनराव गंधाक्ते भारती न्यायपेल्ली काॅ पांडुरंग शिंदे, श्रीधर आदिक, लक्ष्मण नवले, विलास नवले, अशोक गायकवाड, दिपक शिरसाठ, तुषार सोनवणे, सतिश पवार आदींसह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.  स्वाभिमानीही आंदोलनात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने शुक्रवारी (ता.२५) पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सामील होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने शेतकरी कायदा संमत केल्याच्या विरोधात कडकडीत बंद पाळावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.  ----------------------------

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com