परभणीत भारतीय किसान संघातर्फे शेतकरीप्रश्‍नी धरणे

भारतीय किसान संघातर्फे शेतकरीप्रश्‍नी धरणे
भारतीय किसान संघातर्फे शेतकरीप्रश्‍नी धरणे

परभणी ः राज्य सरकारने दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे. कृषी निविष्ठांना जीएसटीमधून वगळण्यात यावे, या मागण्यांसाठी भारतीय किसान संघातर्फे मंगळवारी (ता. ८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

कर्जमाफीबद्दल देशभरात उलटसुलट चर्चा सुरू आहे. कर्जमाफी शेतकऱ्यांच्या समस्यांचे संपूर्ण समाधान नाही. देशातील ९० टक्के शेतकरी अनंत अडचणींचा सामना करुनही कर्जाची परतफेड करतात. त्यामुळे राज्य सरकारने दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे. 

शेतीसाठी लागणाऱ्या खते, बियाणे, कृषी अवजारे आदी कृषी निविष्ठांना जीएसटी मधून वगळण्यात यावे, या मागण्यांसाठी भारतीय किसान संघाचे जिल्हामंत्री बळवंत कौसडीकर, जिल्हाध्यक्ष नामदेव बुचाले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. ८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या धरणे आंदोलनामध्ये तुकाराम दहे, सुंदरराव शिंदे, भगवान खटिंग, राजाभाऊ कदम, रामकिशन वाघ सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com