अकोल्यात भारिप तर वाशीममध्ये राष्ट्रवादी मोठा पक्ष

Bharip in Akola and Nationalist party in Washim
Bharip in Akola and Nationalist party in Washim

अकोला ः अकोला व वाशीम जिल्ह्यात बुधवारी (ता. आठ) आलेल्या जिल्हा परिषदेच्या निकालात अनुक्रमे भारीप बहुजन महासंघ आणि राष्ट्रवादी काँग्रेस मोठे पक्ष म्हणून समोर आले आहेत. अकोला जिल्ह्यात गेल्या १५ वर्षांपासून वर्चस्व राखलेल्या भारिप बहुजन महासंघाने पुन्हा एकदा बाजी मारत राजकीय पक्षांना धूळ चारली. या दोन्ही जिल्हा परिषदांमध्ये सध्याचे चित्र पाहिले तर अकोल्यात भारिप बहुजन महासंघ व वाशीममध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे सत्तेच्या चाव्या जाऊ शकतात.

अकोला जिल्हा परिषदेच्या ५० जागांचे निकाल हातात आले असून, त्यापैकी २१ जागांवर भारिप बहुजन महासंघाने विजय मिळवला. एका ठिकाणी भारिप-बमसं समर्थित एक अपक्ष निवडून आल्याने पक्षाची सदस्य संख्या २२ झालेली आहे. ५३ सदस्य संख्या असलेल्या या जिल्हा परिषदेत अध्यक्षपदासाठी २७ सदस्यांचे बहुमत लागणार आहे. अजून तीन ठिकाणचे निकाल येणे बाकी असल्याने हा आकडा बदलण्याची चिन्हे आहेत. 

या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या प्रमाणात ताकद लावली होती. मात्र, कोणालाही अपेक्षित यश मिळालेले नाही. शिवसेना स्वतंत्र लढूनही भाजपपेक्षा चार जागा जास्त मिळवण्यात यशस्वी झाली आहे. 

वाशीम जिल्ह्यात या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने १२ जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले. काँग्रेसला ९ जागा तर जनविकास आघाडीला सात जागांवर विजय मिळवता आला. भाजप सात जागांवर विजयी झाला. तर शिवसेनेचे सहा सदस्य जिल्हा परिषदेत निवडून आले. दोन अपक्षांनीही विजय मिळवला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने या जिल्हा परिषदेत खाते उघडत एक जागा मिळवली. या जिल्ह्यात मागील काळात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती. काँग्रेसकडे अध्यक्षपद व राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष होता. आता मात्र राष्ट्रवादी मोठा पक्ष झाला आहे. 

अकोला जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल : भारिप बहुजन महासंघ - २१, शिवसेना ११, भाजप ७, राष्ट्रवादी काँग्रेस ३, काँग्रेस ४, अपक्ष ४ ः एकूण जागा ५३, जाहीर निकाल ५०.

वाशीम जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल : राष्ट्रवादी १२, भाजप ७, काँग्रेस ९, वंचित ८, जनविकास ७, शिवसेना ६, अपक्ष २, स्वाभिमानी १, एकूण जागा ५२.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com