अकोला जिल्हा परिषदेत ‘भारिप’चे स्थान अढळ 

Bharipe's position in Akola District Council
Bharipe's position in Akola District Council

अकोला ः जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालात अकोल्याचा गड कायम ठेवण्यात भारिप बहुजन महासंघाने बाजी मारली. सर्व राजकीय पक्षांनी जोरदार ताकद लावूनही मतदारांनी भारीप-बमसंला पुन्हा संधी दिली. प्रामुख्याने या निवडणुकीत भाजपने ज्या ताकदीने गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली होती आणि प्रचार केला, त्याच्या तुलनेत मिळालेले अपयश हे ठळक दिसून पडणारे आहे. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा, केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी गावोगावी जाऊन केलेला प्रचार, जिल्ह्यातील चार भाजप आमदारांचे प्रयत्न हे सर्व काही असतानाही निकाल मात्र निराशाजनक आलेले आहेत. या निकालाने ॲड. प्रकाश आंबेडकरांनी छोट्या-छोट्या समाजाची, वंचितांची जी मोट बांधण्याचा पॅटर्न तयार केला, त्याला पुन्हा या निकालातून मतदारांनी पसंती दिली. या निवडणुकीत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेचे यश हे अधिक उजवे ठरत आहे. कुठल्याही मोठ्या सभा न घेता कार्यकर्त्यांनी ताकदीने मेहनत घेत १३ जागांवर विजय खेचून आणला. यामुळे आता शिवसेना हा भारिप-बमसंनंतर अकोला जिल्हा परिषदेत सर्वांत मोठा पक्ष बनला आहे.

या निवडणुकीची मोठी सल भाजपच्या मनात तयार झाली. कारण राज्याच्या सत्तेतून बाहेर पडलेल्या भाजपला किमान जिल्ह्यात तरी स्थान मिळेल, अशी अपेक्षा लागली होती. पक्षाचे नेते ताकदीने प्रचारात उतरले होते. केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे जिल्ह्यात तळ ठोकून होते. पक्षाचे आमदार, माजी मुख्यमंत्री, इतर जिल्ह्यातील नेतेही प्रचाराला आले होते. तरीही सातच जागा जिंकता आल्या. गेल्या वेळी १३ जागा भाजपला मिळाल्या होत्या. या जागांमध्ये वाढ न होता उलट सहा जागांवर फटका बसला. तुलनेने शिवसेनेने मोठी मुसंडी घेतली. 

गेल्या वेळी ९ जागांवर असलेल्या शिवसेनेला आता १३ जागा मिळवता आल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती मात्र सुधारली नाही. दोन्ही पक्षांना केवळ तीन-तीन जागा मिळाल्या. त्यापेक्षा अपक्षांनी चार जागा जिंकल्या. हे अपक्ष भारिप-बमसंच्या सोबतीला गेले तर त्यांना सत्ता स्थापन करण्याला काहीही अडचण येणार नाही. भारिपला बहुमतासाठी ५३ पैकी २७ जागा हव्या आहेत.

असे आहे बलाबल
भारिप बहुजन महासंघ २३
शिवसेना १३
भाजप
काँग्रेस
राष्ट्रवादी
अपक्ष
एकूण जागा ५३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com