agriculture news in marathi Bhartiya Communist Party agitators burns electricity bill cut permission letter | Page 4 ||| Agrowon

ऊसबिलातून वीजबिल कपातीच्या आदेशाची भाकपकडून होळी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 नोव्हेंबर 2021

नगर : शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून साखर कारखान्यांनी वीजबिल कपात करण्याच्या आदेशाची राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर होळी करण्यात आली. 

नगर : शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून साखर कारखान्यांनी वीजबिल कपात करण्याच्या आदेशाला विरोध करत नगर येथे मंगळवारी (ता. २) महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरातील लालटाकी येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर होळी करण्यात आली. 

शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून वीजबिल कपात करण्याचे आदेश साखर कारखान्यांना दिले आहेत. हे आदेश अत्यंत चुकीचे, बेकायदेशीर व अन्यायकारक आहेत. हा आदेश मागे घेण्याची मागणी करत महाराष्ट्र राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अ‍ॅड. सुभाष लांडे, अ‍ॅड. बन्सी सातपुते, अ‍ॅड. सुधीर टोकेकर, भैरवनाथ वाकळे, बापूराव राशीनकर, संजय नांगरे, अशोक नजन, अप्पासाहेब वाबळे, गहिनीनाथ आव्हाड, सुलाबाई आदमाने, भारत आरगडे, भगवान गायकवाड, सतीश पवार, लक्ष्मण कडू, तुषार सोनवणे, फिरोज शेख, दत्ता वडवणीकर, प्रा.डॉ. गणेश विधाटे आदींसह कार्यकर्त्यांनी प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयासमोर आंदोलन केले. 

वीजबिल वसुलीसाठी वीजवितरण कंपनीकडे कर्मचारी असताना साखर कारखान्यामार्फत वसूल करण्याचे कोणतेही कारण नाही. ऊस उत्पादकांच्या संमतीशिवाय कोणतीही कपात करणे बेकायदेशीर आहे. विद्युत महावितरणने शेतकऱ्यांवर मनमानी सुरू केली आहे. थकीत वीजबिलापोटी कनेक्शन तोडणे, नवीन कनेक्शन देण्यासाठी खुदाईचा खर्च शेतकऱ्यांकडून घेणे अशी दडपशाही सुरू आहे. मुळात अतिवृष्टीमुळे शेतकरी आपली पिके गमावून बसला आहे. पावसाळ्यात घरात असलेल्या मोटारीवर वीजबिल आकारणी करून भरमसाट वीजबिले वाढवली आहेत. हे वीजबिल शासनाने माफ करण्याची आवश्यकता असताना वसुलीची सक्ती केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 
 


इतर ताज्या घडामोडी
वाशीम जिल्ह्यात रब्बी हंगाम अर्ध्यावर;...रिसोड, जि. वाशीम ः यंदाचा रब्बी हंगाम अर्ध्यावर...
अमरावती जिल्ह्यातील १९५९ गावांत...अमरावती : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील २ लाख...
कवठेमहांकाळ तालुक्यात पिकाचे पंचनामे...घाटनांद्रे, जि. सांगली ः कवठेमहांकाळ तालुक्यात...
पुणे जिल्ह्यातील १ हजार शेतकरी होणार...पुणे ः जिल्ह्यात १ हजार शेतकरी कृषी निर्यातदार...
आजरा तालुक्यात यंदा ३०० हेक्टरवर रब्बी...आजरा, जि. कोल्हापूर आजरा तालुक्यात जमिनीला वापसा...
नांदेड जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार...नांदेड : जिल्ह्यात २९ डिसेंबर रोजी झालेल्या...
शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...यवतमाळ : शेतकऱ्यांना तंत्रज्ञान स्वातंत्र्य...
अनुकूल स्थिती होताच शर्यतींना परवानगी ः...पुणे ः ‘‘राज्यात कोविडमुळे काही भागांमध्ये...
मोदी म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेलेत...चंडीगड ः मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे...
रब्बी पीक हानीबाबत पूर्वसूचना दाखल करापुणे ः राज्यात खरिपानंतर आता रब्बी हंगामातील...
थंडी कमी, तापमानात वाढपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सिंधुदुर्गात ऊसतोड रखडलीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ऊसशेती तोडणी अभावी...
कळमनामध्ये सोयाबीनची आवक मंदावलीनागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
जालन्यात तुरीची सर्वाधिक आवकजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
‘महाबीज’च्या बीजोत्पादकांना मिळणार एकच...अकोला ः राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे...
नगरला वांगी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा...नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
चोपडा साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे धरणे...चोपडा, जि.जळगाव : चोपडा साखर कारखान्याचे काही...
पुष्प संशोधन संचालनालयाचे कार्यालय,...पुणे ः भारतीय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या...
हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा...नांदेड : सोलापूर, मराठवाडा, कर्नाटकच्या सीमेवरील...