Agriculture news in Marathi bhavantar scheme want for cotton with high moisture content | Agrowon

अधिक ओलावा असलेल्या कापसासाठी हवी भावांतर योजना 

विनोद इंगोले
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

वर्धा ः कापसात ओलावा असल्यामुळे प्रक्रिया उद्योजक उत्पादकांना हमीभाव देऊ शकत नाही. त्यामुळे हमीभाव आणि व्यापाऱ्यांकडून दिल्या जाणारा प्रत्यक्ष दर यातील तफावतीकरिता भावांतर योजनेचा पर्याय अवलंबिण्याची मागणी व्यापारी, शेतकऱ्यांतर्फे होत आहे. 

वर्धा ः कापसात ओलावा असल्यामुळे प्रक्रिया उद्योजक उत्पादकांना हमीभाव देऊ शकत नाही. त्यामुळे हमीभाव आणि व्यापाऱ्यांकडून दिल्या जाणारा प्रत्यक्ष दर यातील तफावतीकरिता भावांतर योजनेचा पर्याय अवलंबिण्याची मागणी व्यापारी, शेतकऱ्यांतर्फे होत आहे. 

राज्याचे सरासरी कापूस लागवड क्षेत्र ४० लाख हेक्‍टरचे आहे. गेल्या वर्षी कापूस दरात आलेल्या तेजीच्या परिणामी या वर्षी कापूस क्षेत्र सरासरीच्या तुलनेत दोन लाख हेक्‍टरने वाढत सुमारे ४२ लाख हेक्‍टरवर पोचले आहे. क्षेत्र वाढल्याने कापूस गाठीचे उत्पादनही वाढेल असा अंदाज होता. परंतु सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिन्यांत झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादकता आणि उत्पन्न या दोन्ही अपेक्षांवर पाणी फेरले गेले. कापसाची उत्पादकताही प्रभावित झाली. साडेचार लाख हेक्‍टर क्षेत्र कापसाखाली असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात या वर्षी महागाव तालुक्‍यात कापूस उत्पादकता अनेक शेतकऱ्यांना एकरी १ ते २ क्‍विंटलचीच मिळाली आहे. त्यामुळे दरात तेजी येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, कापूस बोंडात पाणी शिरत कापूस भिजला. 

परिणामी ओलावा असलेला कापूसच बाजारात पोचत असल्याने तो खरेदी करताना व्यापाऱ्यांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ तसेच सीसीआयकडून ८ टक्‍क्‍यांपर्यंत आर्द्रता असलेल्या कापसाला ५५५० रुपयांचा हमीभाव दिला जातो. त्यानंतर प्रत्येक टक्‍क्‍यासाठी १ किलोप्रमाणे पैसे कापले जातात. १२ टक्‍के आर्द्रतेपर्यंतचा कापूस शासकीय यंत्रणा खरेदी करते. या वेळी ८ ते १२ टक्‍के आर्द्रतेसाठी सरासरी चार किलोचे पैसे कापले जातात. ५३३५ रुपयांचा दर १२ टक्‍के आर्द्रतेपोटी मिळतो. 

खासगी बाजारात मात्र १२ टक्क्यां‍पेक्षा अधिक आर्द्रतेचा कापूसही खरेदी केला जात आहे. त्याकरिता सरासरी ५१०० रुपयांचा दर दिला जात आहे. दरम्यान व्यापाऱ्यांनी जास्त आर्द्रतेचा कापूस खरेदी केल्यास हमीभाव आणि दिला जाणारा दर यांतील तफावतीची भरपाई भावांतर योजनेच्या माध्यमातून व्हावी, अशी अपेक्षा व्यापारी स्तरावरून व्यक्‍त केली जात आहे. हिंगणघाट बाजार समितीत उलाढाल वाढती आहे. या भागात सुमारे १९ जिनिंग प्रेसिंग आहेत. हंगामात सुमारे १७ ते १९ लाख क्‍विंटल कापसाची उलाढाल या बाजारात होते.

खासगी बाजारात जास्त ओलावा असलेला कापूस नाइलाजाने खरेदी केला जात आहे. प्रक्रिया उद्योगांना कापसाची गरज असते. शेतकऱ्यांनादेखील ओला कापूसच विकावा लागत आहे. ही बाब लक्षात घेता शासनाने खासगी स्तरावर खरेदी केलेल्या कापसासाठी भावांतर योजना राबवावी. ५१०० रुपयांचा दर मिळाल्यास उर्वरित रक्‍कम भावांतर योजनेच्या धर्तीवर थेट शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा केली पाहिजे. मध्य प्रदेशात अशा प्रकारची योजना सरसकट राबविण्यात आली. महाराष्ट्रात कापसाकरिता भावांतर योजनेचा विचार व्हावा. शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.
- ओम दालिया, संचालक, प्रकाश व्हाइट गोल्ड, जिनिंग प्रेसिंग, हिंगणघाट, वर्धा.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...