agriculture news in Marathi, Bhave committee recommend that dont divert Tata-Koyna water, Maharashtra | Agrowon

टाटा-कोयनेचे पाणी वळवू नकाः भावे समितीच्या शिफारस
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 जून 2019

पुणे  : टाटा व कोयना धरणातील ११५ टीएमसी पाणी दुष्काळी भागाला न वळवण्याची शिफारस करणारा अहवाल भावे समितीने दिला आहे. ‘‘हा अहवाल चुकीचा असून आता खरा अहवाल आम्ही शासनासमोर ठेवू,’’ असे टाटा कोयना पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांनी घोषित केले आहे. 

पुणे  : टाटा व कोयना धरणातील ११५ टीएमसी पाणी दुष्काळी भागाला न वळवण्याची शिफारस करणारा अहवाल भावे समितीने दिला आहे. ‘‘हा अहवाल चुकीचा असून आता खरा अहवाल आम्ही शासनासमोर ठेवू,’’ असे टाटा कोयना पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल कदम यांनी घोषित केले आहे. 

जलसंपदा विभागाने भावे समितीच्या अहवालाबाबत अद्याप काही भाष्य केलेले नाही. मात्र, वाहून जाणारे पाणी कसे वापरता येईल याबाबत पुन्हा एक समिती नेमली आहे. “टाटाच्या ताब्यात असलेल्या सहा व कोयना धरणाचे पाणी उपयोगात आणले जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाटा-कोयनेचे पाणी दुष्काळी भागाला देण्याचे आश्वासन जनतेला दिले होते. मात्र, भावे समितीने मध्येच चुकीचा, तकलादू आणि एकांगी अहवाल सादर केला. तो सरकारी धोरणाच्या विसंगत आहे,” असे कदम यांनी नमूद केले. 

या धरणांचे पाणी कृष्णा, भीमा खोऱ्यातील दुष्काळी भागाकडे वळविण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून कदम यांनी लावून धरली आहे. त्यांनी किसान आर्मी व वॉटर आर्मीची स्थापना करून आंदोलनेही केली. सरकारने यानंतर हालचाली करीत जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव अ. पां. भावे  यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट तयार केला होता. पाणी वळविले तर इतर राज्येही या पाण्यावर हक्क सांगतील, असे भावे समितीचे म्हणणे आहे.  

“मुळात भावे समितीने परस्पर बैठका घेतल्या. जनतेला त्यात सहभागी करून घेतले नाही. आमच्या आंदोलनानंतर समितीने तीन महिन्यांचा कालावधी वाढवून घेतला. त्यानंतर पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवू नये असा ढोंगी अहवाल सादर केला,” असे कदम यांचे म्हणणे आहे. 

भावे समितीने कोणत्या बाबी वगळल्या
पश्चिमेकडून पाणी पूर्वेकडे वळवण्याची गरज, त्यानंतर होणारे परिणाम, पर्यावरणाची स्थिती, पाणी वळवल्यानंतर होणारा तुलनात्मक फायदा, धरणालगतच्या गावांना पाणी मिळत नसल्याबद्दलची भूमिका, विद्युत कायदा २००३ आणि त्याची मूलतत्त्वे, या उपक्रमासाठी जल तंत्रज्ञान व विविध पर्याय, दीर्घकालीन नियोजन अशा बाबी समितीने अभ्यासातून वगळल्या, असेही कदम यांचे म्हणणे आहे.

इतर ताज्या घडामोडी
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...