भेंडीची तोडणी सूरू, पुरवठाही वाढला..(video सुद्धा)

भेंडी उत्पादक सोमनाथ नवले म्हणाले की, ४० रुपये किलोने विकली जाणारी भेंडी आता ३० रुपये दराने विकावी लागत आहे.
भेंडीचा पुरवठा वाढला
भेंडीचा पुरवठा वाढला

नाशिक : बागायती भागातून वाढलेला पुरवठा आणि पावसाळी वातावरणामुळे नाशिक भागात भेंडीच्या मागणीत किंचित घट झाली आहे. त्यामुळे भावात सुधारणा होत नसल्याची माहिती भेंडी उत्पादक शेतकऱ्यांनी दिली.

भेंडी उत्पादक सोमनाथ नवले म्हणाले की, ४० रुपये किलोने विकली जाणारी भेंडी आता ३० रुपये दराने विकावी लागत आहे. नाशिक मार्केटला आधी मी ४०० रुपये क्रेट (१० ते १२ किलो) माझा पहिला तोडा विकला. मात्र, गेल्या ४-५ दिवसांपासून भाव प्रति क्रेट २५० ते ३०० रुपयांवर आले आहेत. शेतकऱ्यांकडून भेंडीची तोडणी सुरू...  पहा video

श्री.नवले यांनी ३०० रुपये मोजून १०० ग्रॅम भेंडी बियाणे आणले होते. त्यांनी दोन गुंठ्यात लागवड केली होती. भेंडीचा पुरवठा यापुढेही चांगला राहील. मात्र, भाव फारसे वाढणार नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, नाशिक मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भेंडीचा पुरवठा गुजरात भागातून वाढला आहे. दुसऱ्या बाजूला एरवी मुंबईच्या दिशेने जाणारा माल लॉकडाउनमुळे अडकून पडतो आहे. हा माल देखील स्थानिक बाजारात येत असल्यामुळे भेंडीची आवक वाढून भाव कमी झाले आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com