‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा चाळ 

भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन संकल्पनेतून एक कोटी रुपये खर्चाचा पहिला कांदाचाळ प्रकल्प शिरूर भागात उभारला आहे. विशेष म्हणजे ऐन लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांनी ही कामगिरी केली आहे.
bhimaghod
bhimaghod

पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन संकल्पनेतून एक कोटी रुपये खर्चाचा पहिला कांदाचाळ प्रकल्प शिरूर भागात उभारला आहे. विशेष म्हणजे ऐन लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांनी ही कामगिरी केली आहे.  राज्याच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी एकात्मिक कृषी विकास संकल्पनेत ‘नाफेड’ व ‘महाएफपीसी’ एकत्रितपणे काम करीत आहेत. त्यातून ‘महाओनियन’ नावाने संयुक्त भागीदारी प्रकल्प सुरू करण्याची योजना गेल्या वर्षी मांडली गेली. त्यातील पहिला टप्पा साकारण्यात ‘भीमाघोड’ कंपनीने बाजी मारली. या कंपनीने ऐन लॉकडाउनमध्ये पहिला पथदर्शक प्रकल्प पिंपळसुटी गावात उभारून पूर्ण केला.  कांदा व्यापार क्षेत्रात शेतकरी कंपनीने खासगी व सरकारी भागीदारीतून शिरूर भागात साकारलेली एक हजार टन क्षमतेची अशी पहिलीच पायाभूत सुविधा आहे. येथे ऐन पावसाळ्यात देखील तेथे छाननी, प्रतवारी, वजन,  वाहतूक आणि साठवण उत्तम प्रकारे करता येईल. या प्रकल्पात कंपनीने २० टक्के, ‘महाएफपीसी’ने पाच टक्के तर ‘नाफेड’ने २५ टक्के भांडवल दिले आहे. उर्वरित भांडवल केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान रुपात मिळाले आहे.  कांदा शेतीत अधिक नफेशीर व्यवस्था आणायची असल्यास व्यावसायिक पद्धतीने पुढे जावे लागेल असे ‘भीमाघोड’चे अध्यक्ष संतोष नागवडे व सचिव राहुल खंडागळे यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. त्यामुळे या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी जमिनी तसेच भांडवल देखील गोळा करून दिले. ‘महाओनियन’ची संकल्पना प्रथम ‘महाएफपीसी’चे अध्यक्ष योगेश थोरात यांनी मांडली होती. त्यांनी २७ शेतकरी उत्पादक कंपन्यांना कांदा खरेदीत उतरविण्यास यश मिळवले. 

थेट शेतकऱ्यांकडून ३५ हजार टन खरेदी या कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात ३ कोटी २७ लाख रुपयांचा ३५ हजार टन कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केला. यामुळे पर्यायी बाजार व्यवस्था आणि पारदर्शक खरेदी प्रणाली, याचा अनुभव शेतकऱ्यांना आला. त्यामुळे आता ही संकल्पना राज्यभर वाढवली जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com