agriculture news in Marathi Bhimaghod made biggest onion chal Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘भीमाघोड’ने उभारली सर्वांत मोठी कांदा चाळ 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन संकल्पनेतून एक कोटी रुपये खर्चाचा पहिला कांदाचाळ प्रकल्प शिरूर भागात उभारला आहे. विशेष म्हणजे ऐन लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांनी ही कामगिरी केली आहे.

पुणे: भीमाघोड शेतकरी उत्पादक कंपनीने महाओनियन संकल्पनेतून एक कोटी रुपये खर्चाचा पहिला कांदाचाळ प्रकल्प शिरूर भागात उभारला आहे. विशेष म्हणजे ऐन लॉकडाउनमध्ये शेतकऱ्यांनी ही कामगिरी केली आहे. 

राज्याच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी एकात्मिक कृषी विकास संकल्पनेत ‘नाफेड’ व ‘महाएफपीसी’ एकत्रितपणे काम करीत आहेत. त्यातून ‘महाओनियन’ नावाने संयुक्त भागीदारी प्रकल्प सुरू करण्याची योजना गेल्या वर्षी मांडली गेली. त्यातील पहिला टप्पा साकारण्यात ‘भीमाघोड’ कंपनीने बाजी मारली. या कंपनीने ऐन लॉकडाउनमध्ये पहिला पथदर्शक प्रकल्प पिंपळसुटी गावात उभारून पूर्ण केला. 

कांदा व्यापार क्षेत्रात शेतकरी कंपनीने खासगी व सरकारी भागीदारीतून शिरूर भागात साकारलेली एक हजार टन क्षमतेची अशी पहिलीच पायाभूत सुविधा आहे. येथे ऐन पावसाळ्यात देखील तेथे छाननी, प्रतवारी, वजन,  वाहतूक आणि साठवण उत्तम प्रकारे करता येईल. या प्रकल्पात कंपनीने २० टक्के, ‘महाएफपीसी’ने पाच टक्के तर ‘नाफेड’ने २५ टक्के भांडवल दिले आहे. उर्वरित भांडवल केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून अनुदान रुपात मिळाले आहे. 

कांदा शेतीत अधिक नफेशीर व्यवस्था आणायची असल्यास व्यावसायिक पद्धतीने पुढे जावे लागेल असे ‘भीमाघोड’चे अध्यक्ष संतोष नागवडे व सचिव राहुल खंडागळे यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले. त्यामुळे या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी जमिनी तसेच भांडवल देखील गोळा करून दिले. ‘महाओनियन’ची संकल्पना प्रथम ‘महाएफपीसी’चे अध्यक्ष योगेश थोरात यांनी मांडली होती. त्यांनी २७ शेतकरी उत्पादक कंपन्यांना कांदा खरेदीत उतरविण्यास यश मिळवले. 

थेट शेतकऱ्यांकडून ३५ हजार टन खरेदी
या कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात ३ कोटी २७ लाख रुपयांचा ३५ हजार टन कांदा थेट शेतकऱ्यांकडून खरेदी केला. यामुळे पर्यायी बाजार व्यवस्था आणि पारदर्शक खरेदी प्रणाली, याचा अनुभव शेतकऱ्यांना आला. त्यामुळे आता ही संकल्पना राज्यभर वाढवली जाणार आहे.


इतर अॅग्रो विशेष
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...
राज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...
गुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...
राहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...
कापूस हंगाम लांबणीवर?नागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...
देशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...