agriculture news in marathi, Bhira recorded 49 Degree Celsius in 2005 | Agrowon

भिरातील तापमानाचे रेकॉर्ड यंदा मोडणार?

अमोल कुटे
सोमवार, 29 एप्रिल 2019

पुणे : राज्यामध्ये एप्रिल महिन्यात आतापर्यंतच्या इतिहासात सर्वकालीन उष्ण ठिकाणांमध्ये कोकणातील भिरा सर्वांत उष्ण ठरले आहे. २७ एप्रिल २००५ रोजी भिरा येथे उच्चांकी ४९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती; तर नगर येथे १० एप्रिल २०१० रोजी दुसऱ्या क्रमांकाचे उच्चांकी ४८.२ अंश सेल्सिअस, तसेच ३० एप्रिल २००९ रोजी नागपूर येथे तिसरे सर्वकालीन उच्चांकी ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाकडील नोंदींवरून स्पष्ट होत आहे. 

पुणे : राज्यामध्ये एप्रिल महिन्यात आतापर्यंतच्या इतिहासात सर्वकालीन उष्ण ठिकाणांमध्ये कोकणातील भिरा सर्वांत उष्ण ठरले आहे. २७ एप्रिल २००५ रोजी भिरा येथे उच्चांकी ४९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती; तर नगर येथे १० एप्रिल २०१० रोजी दुसऱ्या क्रमांकाचे उच्चांकी ४८.२ अंश सेल्सिअस, तसेच ३० एप्रिल २००९ रोजी नागपूर येथे तिसरे सर्वकालीन उच्चांकी ४७.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाकडील नोंदींवरून स्पष्ट होत आहे. 

सध्या भिरा येथील केंद्रातून नोंदी घेणे बंद असून, या ठिकाणी केंद्राचे काम सुरू आहे. उन्हाचा चटका चांगलाच वाढला असून, यंदा एप्रिल महिन्यातील तापमानाचे आतापर्यंतचे उच्चांक मोडीत निघाले आहेत. शनिवारी (ता. २८) विदर्भातील बुलडाणा ४३.३, चंद्रपूर ४६.५, मराठवाड्यातील परभणी ४५.७ येथे आतापर्यंतच्या सर्वकालीन उच्चांकी तापमानाची नोंद झाली. 

यापूर्वी बुलडाणा येथे ३० एप्रिल २००९ रोजी उच्चांकी ४३.२ अंश सेल्सिअस, चंद्रपूरमध्ये २००९ मध्ये २२ एप्रिल रोजी ४६.४ अंश सेल्सिअस, तर परभणी येथे २०१६ मध्ये २१ व २२ एप्रिल रोजी ४५.१ सेल्सिअस तापमान नोंदले गेले होते. सध्या अकोला (४६.७) सर्वांत उष्ण ठरत असले तरी, तेथे ३० एप्रिल २००९ मध्ये आतापर्यंतच्या उच्चांकी ४७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

राज्यातील विविध ठिकाणचे एप्रिल महिन्यातील आतापर्यंतचे सर्वकालीन उच्चांकी तापमान (अंश सेल्सिअस), कंसात तारीख, वर्ष : पुणे ४३.३ (३०,१८९७), नगर ४८.२ (१०, २०१०), जळगाव ४७.२ (२६,१९७०), कोल्हापूर ४१.७ (२९,१९५६), महाबळेश्वर ३७.६ (२१,१९७६), मालेगाव ४५.६ (३०.२००९), नाशिक ४२.२ (२४.१९५८), सांगली ४३.० (१४,१९७३), सातारा ४२.४ (३०,२०१३), सोलापूर ४४.९(२२,२०१६), अलिबाग ४०.० (१९,१९५५), भिरा ४९ (२७, २००५),डहाणू ४०.६ (१९,१९५५), सांताक्रूझ ४२.२ (१४,१९५२), रत्नागिरी ३७.५ (७,१९८९), औरंगाबाद ४३.६ (२६,१९५८), बीड ४४.६ (१५,१९८१), परभणी ४५.७ (२७,२०१९), उस्मानाबाद ४३.८ (२२,२०१६), नांदेड ४६.० (७,२००५), अकोला ४७.० (३०,२००९), अमरावती ४६.१ (३०,१९५८), बुलडाणा ४३.३ (२८,२०१९), बह्मपुरी ४६.५ (२३,१९८१), चंद्रपूर ४६.५ (२८,२०१९), गोंदिया ४६.१ (३०,२००७), नागपूर ४७.१ (३०,२००९), वर्धा ४६.४ (३०,१९९६), यवतमाळ ४५.५(१४,१९७३).


इतर अॅग्रो विशेष
सूक्ष्म सिंचन योजनेचा सात वर्षानंतर...अकोला ः सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना...
कोल्हापुरातील गूळ हंगाम अंतिम टप्प्यातकोल्हापूर : यंदाचा गूळ हंगाम अंतिम टप्प्यात येत...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
सकाळी गारठा, तर दुपारी चटकापुणे : राज्यात कमाल तापमानातील वाढीबरोबरच किमान...
थेट सरपंच निवड रद्दमुंबई: थेट सरपंच निवड रद्द करणारे विधेयक मंगळवारी...
निर्यात न करणाऱ्या कारखान्यांच्या साखर...कोल्हापूर : देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...
राज्यात उन्हाचा चटका कायम पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत....
‘पीएम-किसान’ योजनेत शेतकऱ्यांना ५१ हजार...नवी दिल्ली: केंद्र सरकारने गेल्या वर्षी पंतप्रधान...
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा गदारोळ मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन...
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
कृषी शिक्षणाचा खर्चही आता लाखाबाहेर पुणे : राज्यातील खासगी कृषी शिक्षण संस्थांच्या...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...