ब्रह्मपुरी उच्चांकी ४८.१ अंशांवर

तापमान
तापमान

पुणे : सूर्य तापल्याने उष्णतेच्या लाटेमध्ये विदर्भ अक्षरश: भाजून निघत आहे. शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या चार तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे यंदाच्या हंगामातील उच्चांकी ४८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर विदर्भातील अनेक ठिकाणी तापमान ४६ अंशांच्या पुढे गेल्याने घराबाहेर पडणे अशक्य होत आहेत. आज विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. शुक्रवारी (ता. ७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरीसह चंद्रपूर, वर्धा येथे तापमानाचा पारा ४७ अंशांच्या पुढे, तर अमरावती, गोंदिया, नागपूर येथे ४६ अंशोपक्षा अधिक, अकोला, यवतमाळमध्ये ४५ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातील परभणी, औरंगाबाद आणि मध्य महाराष्ट्रातील मालेगाव येथेही उष्णतेची लाट आली आहे. विदर्भात मंगळवारपर्यंत (ता. ११) उष्णतेची तीव्र लाट कायम राहणार असून, मराठवाड्यात आज (ता. ८) उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.   शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.७ (१.०), जळगाव ४३.२ (२.८), कोल्हापूर ३३.५(१.०), महाबळेश्वर २८.३ (२.७), मालेगाव ४३.६ (६.३), नाशिक ३४.१ (-१.४), सांगली ३६.० (२.०), सातारा ३५.२ (३.०), सोलापूर ४०.४(३.६), अलिबाग ३६.० (३.०), डहाणू ३४.८ (०.५), सांताक्रूझ ३५.१ (१.९), रत्नागिरी ३३.८ (२.२), औरंगाबाद ४२.२ (७.०), बीड ३५.६ (-१.६), परभणी ४४.१ (५.०), नांदेड ४३.५ (४.०), अकोला ४५.८ (५.८), अमरावती ४६.४ (७.१), बुलडाणा ४१.५ (५.३), बह्मपुरी ४८.१ (७.६), चंद्रपूर ४७.२ (६.१), गोंदिया ४६.२ (५.६), नागपूर ४६.८ (५.९), वाशीम ४३.०, वर्धा ४७.९ (७.६), यवतमाळ ४५.८(६.४).  राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज मॉन्सूनच्या केरळातील आगमनाला पोषक हवामान होत असतानाच, राज्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्वमोसमीच्या हलक्या सरी बरसत आहेत. शुक्रवारी (ता. ७) दुपारी नाशिक, औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. आजपासून (ता. ८) राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणात रविवारपासून (ता. ९) पाऊस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. आज (ता. ८) कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, मठवाड्यातील बीड, हिंगोली, लातूर जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com