Agriculture news in marathi Bhumi Pujan of works of eight dams in Shirpur taluka | Agrowon

शिरपूर तालुक्यात आठ बंधाऱ्यांच्या कामांचे भूमीपूजन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 ऑक्टोबर 2021

शिरपूर, जि. धुळे : तालुक्यातील बोरगाव, जातोडा आणि वनावल परिसरातून जाणाऱ्या नाल्यावर शिरपूर पॅटर्नअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या आठ बंधाऱ्यांच्या कामांचे भूमिपूजन आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 

शिरपूर, जि. धुळे : तालुक्यातील बोरगाव, जातोडा आणि वनावल परिसरातून जाणाऱ्या नाल्यावर शिरपूर पॅटर्नअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या आठ बंधाऱ्यांच्या कामांचे भूमिपूजन आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. 

जातोडा-चांदपुरी रस्त्यावर झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण, माजी नगरसेवक अशोक कलाल, वनावल गटाच्या जिल्‍हा परिषद सदस्या अभिलाषा पाटील, शिसाका संचालक भरत पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती जगतसिंह राजपूत, बाळदे येथील विठ्ठलधाम ट्रस्टचे सचिव निंबा पाटील, पंचायत समिती सदस्य ममता चौधरी, बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील उपस्थित होते.  

डॉ. रंधे म्हणाले, ‘शेतीसाठी सिंचनाची भरीव सोय व्हावी, या हेतूने बंधाऱ्यांचे काम सुरु आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करायला हवे. बंधाऱ्यांसाठी शेतालगतची थोडीफार जागा द्यावी लागली तर मागेपुढे पाहू नये.’’ 

जातोड्याचे सरपंच रावसाहेब धनगर, उपसरपंच दर्यावसिंह राजपूत, बोरगावचे उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, वनावलचे माजी सरपंच मनोहर पाटील, उप्परपिंड सरपंच योगेश पाटील, खर्दे पाथर्डेचे सरपंच सतीश पाटील आदी उपस्थित होते. आर. सी. सिसोदिया यांनी सूत्रसंचालन केले. 

बंधाऱ्यांची मालिका 

वाघाडी (ता. शिरपूर) पासून बोरगाव, जातोडा, वनावल परिसरातून वाहत जाणारा नाला वनावल येथे तापी नदीला जाऊन मिळतो. वाघाडी परिसरात यापूर्वीच नाल्यावर चार बंधारे बांधले आहेत. जातोडा आणि वनावल परिसरात एकूण आठ बंधारे साकारले जातील. त्यामुळे या परिसरातील शेती सिंचनाखाली येण्यास मदत होईल.


इतर बातम्या
बासमतीची निर्यात वाढण्याची शक्यता इराण आणि सौदी अरेबियाकडून होणारी बासमती तांदळाची...
राज्यात थंडीची लाट पसरणार :...पुणे : पाकिस्तान मार्गे देशाच्या पश्चिम...
गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात ५३...आर्थिक उदारीकरणानंतर (Economic liberalization)...
आंबा, काजू हंगाम उशिरा सुरू होण्याचा...  वृत्तसेवा - गेल्या आठवड्याच्या शेवटी...
अन् शेतकऱ्याच्या हातात उरतं फक्त पाचटउसाला तुरा लागणं याला शेतकरी उसाचं वय झालं असं...
केंद्र सरकारकडून ६०६.१९ लाख टन...केंद्र सरकारने २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात एकूण...
खाद्यतेलातील तेजीचा  सोयाबीनला लाभ...पुणेः देशात पामतेलाची उपलब्धता कमी असल्याने...
तापमानात घट; द्राक्ष मण्यांना तडे नाशिक : रविवारी (ता.२३) रोजी सकाळपासूनच धुके आणि...
उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा...पुणे : आखाती देशातून आलेल्या धूळ वादळामुळे...
जास्त उत्पादकतेच्या कापूस  बियाण्याला...पुणेः पाकिस्तानमध्ये कापसाची उत्पादकता दिवसेंदिवस...
गुहागरमध्ये दीडशे एकरातील  आंबा, काजू...गुहागर, जि. रत्नागिरी : तालुक्यातील गिमवी देवघर...
गावरान लाल मिरचीचा यंदा ठसकानांदेड : नायगाव तालुक्यातील बरबडा येथील गावरान...
उन्हाळ्यात पाणी टंचाई कमी भासणार पुणे : पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने भूगर्भातील...
वाशीममध्ये दर शनिवारी  होणार हळद खरेदी...वाशीम ः हळदीचे उत्पादन घेण्यात विदर्भात आघाडीवर...
जालन्यात गहु सोंगणीला सुरुवातपिंपळगाव रेणुकाई, जि. जालना : पिंपळगाव रेणुकाईसह...
रिक्तपदांमुळे नांदेड कृषी विभाग सलाइनवरनांदेड : साडेपाच लाख खातेदार शेतकऱ्यांचा कारभार...
वीजपुरवठा खंडित केल्याशिवाय पर्याय नाही...मुंबई : राज्यातील कृषी वीज पंप ग्राहकांकडे ४१...
बुलडाणा जिल्ह्यात तेरा बाजार...खामगाव, जि. बुलडाणा ः जिल्ह्यातील तेरा कृषी...
पुणे जिल्ह्यात ७७ लाख टन उसाचे गाळपपुणे ः साखर कारखान्यांचा गाळप हंगाम मध्यावर आला...
तोडणीला उशीर होत असल्याने उसाला तुरेनगर : गत दोन वर्षात मोठ्या प्रमाणात झालेल्या...