भाऊसाहेब रुपनर सांगोल्याचे ‘शेकाप’चे उमेदवार

भाऊसाहेब रुपनर
भाऊसाहेब रुपनर

सोलापूर  ः शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सांगोला विधानसभेसाठी ‘शेकाप’चे अधिकृत उमेदवार म्हणून अखेर भाऊसाहेब रुपनर यांच्या नावाची घोषणा आमदार गणपतराव देशमुख व शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली.  श्री. देशमुख यांनी वयोमानानुसार यंदाच्या निवडणुकीत थांबण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांचा वारसदार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

रविवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका एकमेव मतदारसंघ गेल्या ५० वर्षांपासून ‘शेकाप’च्या ताब्यात आहे. स्वतः आमदार देशमुख हे १९७२ आणि १९९५ वगळता या ठिकाणी सलग ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. श्री. देशमुख सध्या ९४ वर्षांचे आहेत. वयोमानामुळे त्यांना पुढील निवडणूक लढविणे शक्य नसल्याने पक्षाने दुसरा उमेदवार बघावा असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार उमेदवाराचा शोध सुरू होता.

श्री. देशमुख आपला वारसदार म्हणून कोणाला निवडणार याबाबतही उत्सुकता होती. संपूर्ण हयातभर तत्त्वनिष्ठ आणि सचोटीचे राजकारण गणपतराव देशमुख यांनी केले.  आजही आपला वारसदार म्हणून श्री. देशमुख आपल्या चिरंजीवाचे नाव पुढे करू शकले असते. पण त्यांनी तसे केले नाही, यावरूनही पुन्हा त्यांनी आपली तत्त्वनिष्ठता जपल्याचे दिसून येते. भाऊसाहेब रुपनर हे सांगोला तालुक्यात मेडसिंगी गावचे असून ते उच्चशिक्षित आहेत. त्यांचा फॅबटेक नावाने मोठा उद्योग समूह आहे. तसेच शिक्षण संस्थादेखील आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com