मॉन्सूनपूर्व पावसाची बीड जिल्ह्यात दमदार हजेरी

मॉन्सूनपूर्व पावसाची बीड जिल्ह्यात दमदार हजेरी
मॉन्सूनपूर्व पावसाची बीड जिल्ह्यात दमदार हजेरी

बीड : मॉन्सूनचे आगमन होण्यास आणखी दोन दिवस बाकी असतानाच जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सोमवार रात्रीपासून मंगळवार सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी 13 मिमी पाऊस झाला. तीन महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. माजलगाव आणि अंबाजोगाई तालुक्यात मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. माजलगाव महसूल मंडळात 70 मिमी पावसाची नोंद झाली. तर, अंबाजोगाई महसूल मंडळातही 70 मिमी पाऊस झाला. याच तालुक्यातील लोखंडी सावरगाव महसूल मंडळात तब्बल 77 मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय परळी महसूल मंडळात 42 मिमी माजलगाव तालुक्यातील गंगामसला महसूल मंडळात 40 मिमी तर दिंद्रुड महसूल मंडळांतही 63 मिमी पाऊस झाला. मध्यरात्री पासून पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. पावसामुळे काही भागात शेतीमध्ये पाणी थळथळले असून नाले व ओढेही वाहू लागले. 

पाच तालुक्यांत सर्वदुर; दोन तालुक्यात शुन्य मिमी दरम्यान, सर्वाधिक पाऊस माजलगाव तालुक्यात झाला. या तालुक्यात 37.03 मिमी पाऊस झाला. तर अंबाजोगाई तालुक्यात 34.02 मिमी पावसाची नोंद झाली. धारुर, केज, अंबाजोगाई, माजलगाव व पाटोदा या पाच तालुक्यांत सर्वदुर पाऊस झाला. तर, वडवणी व शिरुर कासार तालुक्यात पाऊस झाला नाही.

तालुकानिहाय पाऊस बीड : 7.3 मिमी पाटोदा : 5.5 मिमी गेवराई : 3.3 मिमी अंबाजोगाई : 34.2 मिमी माजलगाव : 37.3 मिमी केज : 17.1 मिमी धारुर : 25 मिमी परळी : 12.88 मिमी. आष्टी : 0.9 मिमी  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com