agriculture news in Marathi, big challenge by AMUL in State, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हान
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 सप्टेंबर 2019

पुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला विस्तार पाहून सहकारी व खासगी दूध प्रकल्पचालकांची चिंता वाढली आहे. “अमूलची घोडदौड कशी रोखावी, याचा मार्ग आम्हाला सापडलेला नाही. त्यात पुन्हा डीलर कमिशन हीच एक मोठी डोकेदुखी बनली आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली. 

गुजरातमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संघांनी स्थापन केलेला ‘अमूल’ हा डेअरी क्षेत्रातील सर्वांत मोठा काॅर्पोरट ब्रॅंड बनला आहे. ‘अमूल’ची २०१८ मधील उलाढाल ३० हजार कोटींची होती. २०१९ मध्ये ती ३३ हजारांच्या पुढे गेली. यंदा उलाढाल ४० हजार कोटींपर्यंत नेण्याचे आक्रमक उद्दिष्ट ‘अमूल’ने ठेवले आहे. 

पुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला विस्तार पाहून सहकारी व खासगी दूध प्रकल्पचालकांची चिंता वाढली आहे. “अमूलची घोडदौड कशी रोखावी, याचा मार्ग आम्हाला सापडलेला नाही. त्यात पुन्हा डीलर कमिशन हीच एक मोठी डोकेदुखी बनली आहे,” अशी माहिती सूत्रांनी दिली. 

गुजरातमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संघांनी स्थापन केलेला ‘अमूल’ हा डेअरी क्षेत्रातील सर्वांत मोठा काॅर्पोरट ब्रॅंड बनला आहे. ‘अमूल’ची २०१८ मधील उलाढाल ३० हजार कोटींची होती. २०१९ मध्ये ती ३३ हजारांच्या पुढे गेली. यंदा उलाढाल ४० हजार कोटींपर्यंत नेण्याचे आक्रमक उद्दिष्ट ‘अमूल’ने ठेवले आहे. 

ग्राहकांकडून मिळवलेल्या एक रुपयांपैकी ८० पैसे शेतकऱ्यांना देण्याचे धोरण अमूलला सतत आघाडीवर ठेवते आहे. राज्यात अलीकडेच खरेदीदर वाढविण्याचे धाडस अमूलने दाखविले. यातून दुधाची पळवापळवी वाढण्याची भीती राज्यातील डेअरीचालकांना वाटते. 

“अमूल, मदर डेअरी, पतंजली या ब्रॅंडकडून राज्यातील खासगी व सहकारी अशा दोन्ही डेअरींसमोर आव्हान उभे केले आहे. राजकीय पाठबळ मिळवून या कंपन्या राज्यात पाय पसरत आहेत. त्यात सर्वांत जास्त धोका आम्हाला अमुलचा वाटतो. अमुलसमोर लहान डेअरीचालकांचा अजिबात टिकाव लागणार नाही. त्यामुळे राज्य शासनाने हस्तक्षेप केला पाहिजे,” अशी प्रतिक्रिया एका डेअरीचालकाने दिली. 

डेअरीक्षेत्रातील अभ्यासकांच्या मते, “शेतकऱ्यांना अमुलने जादा दर देत राज्यात खळबळ उडवून दिली आहे. २९ सीएलआरचेच (करेक्टेडे लॅक्टोमीटर रीडिंग) दूध अमूल स्वीकारते. यात एसएनएफ ८.५ मिळतोच. संकलनात १०० टक्के शीतकरण, उत्पादकांना वाढीव दर देण्याचे धोरण अमूलने ठेवले आहे. राज्यातील छोट्या डेअरीचालकांना अशी सर्व गुणवत्तापूर्ण स्पर्धा करणे परवडत नाही. त्यामुळे चिंता वाढली आहे.”

‘अमूल’ला टक्कर देता येणार नाही
‘गोकुळ’, ‘चितळे’ अशा काही निवडक डेअरींनी सतत बदलते स्वरूप ठेवत विश्वासार्हता ठेवली आहे. मात्र, बहुतेक ठिकाणी कमी गुणवत्तेचे दूध स्वीकारणे, पावडर टाकणे, शेतकऱ्यांना कमी दर देणे, डीलर कमिशन भरपूर ठेवल्याने पेच तयार झाला आहे. त्यामुळे या स्थितीत आपण ‘अमूल’शी टक्कर देऊ शकत नाही, असेही मत अभ्यासकांनी व्यक्त केले.

इतर अॅग्रो विशेष
कलम ३७० पुन्हा आणून दाखवा : नरेंद्र मोदीजळगाव  : हिंमत असेल तर, जम्मू-काश्मीरबाबत...
पीक बदलातून दिली नवी दिशाशिरपूर जैन (ता. मालेगाव, जि. वाशीम) येथील...
अमेरिकेतील भातशेतीची शिवारफेरीअमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यामध्ये सॅक्रामेंटो...
परतीचा प्रवास वेगाने; मध्य, पूर्व...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून)...
सातारा : उसावर अमेरिकन लष्करी अळीचा...सातारा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणीत...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पडणाऱ्या...
राष्ट्रीय संस्थांमध्ये कृषी...दापोली, जि. रत्नागिरी : राष्ट्रीय कृषी...
...हे खूपच संतापजनक आहे : राजू शेट्टीसध्या शेतकऱ्याला भाकरीची गरज आहे, त्याच्या पुढे...
कृषी शिक्षणव्यवस्थेला हवी दिशादेशातील सर्वांत जास्त कृषी विद्यापीठे आणि कृषी...
कर्जबाजारी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा...मुंबई : मधुमेहासारख्या २०० चाचण्या १ रुपयात...
जैवविविधतेचा ऱ्हास करणारा प्रकल्प नकोचनियोजित नवमहाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पाचं क्षेत्र...
पाण्याचा ताळेबंद गरजेचाच नगर जिल्ह्यातील हिवरे बाजार या गावाने यंदाच्या...
साखर कारखान्यांपुढे प्रक्रिया...कोल्हापूर : दोन महिन्यांपूर्वी आलेल्या महापुराचे...
सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका...मुंबई: लोकांच्या मनातला सरकारविरोधी राग...
अन्नपदार्थ निर्यातीसाठी लवकरच नवे धोरणनवी दिल्ली : देशातून प्रक्रियायुक्त...
टोमॅटोची प्युरी विकण्याची मदर डेअरीला...नवी दिल्ली : टोमॅटोचे दर वधारताच केंद्र सरकारने...
परतीच्या पावसाने नांदेडला झोडपलेपुणे : राज्यात परतीच्या पावसाने जोर धरला आहे....
मॉन्सून उत्तर भारतातून परतलापुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शक्रवारी...
कायदेशीर मुद्यांबाबत कृषी विभागाला...पुणे: राज्यात विविध ब्रॅंडखाली कीटकनाशकांच्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा व्यवहारांवर...नाशिक  : जिल्ह्यातील कांदा खरेदी-विक्रीच्या...