सिंधुदुर्गमधील वातावरणात मोठा बदल 

​ सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. गुरुवारी (ता. २८) थंडी पडली होती. तर पहाटेपासून जोरदार वारे वाहू लागले आहेत. वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर सकाळी थंडीचे प्रमाण कमी झाले.
 सिंधुदुर्गमधील वातावरणात मोठा बदल   Big change in the climate of Sindhudurg
सिंधुदुर्गमधील वातावरणात मोठा बदल  Big change in the climate of Sindhudurg

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील वातावरणात मोठा बदल झाला आहे. गुरुवारी (ता. २८) थंडी पडली होती. तर पहाटेपासून जोरदार वारे वाहू लागले आहेत. वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर सकाळी थंडीचे प्रमाण कमी झाले.  जिल्ह्यात १५ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू होता. त्यानंतर एक, दोन ठिकाणी किरकोळ पाऊस पडला. परंतु त्यानंतर वातावरणात फारसे बदल झालेले नाहीत. दिवसभर कडक उन्हाच्या झळा, तर रात्री थोडासा गारवा असेच चित्र होते. त्यानंतर एक, दोन दिवस रात्री थंडीची चाहूलदेखील लागली. परंतु गुरुवारपासून वातावरण पुन्हा मोठे बदल होताना दिसत आहे. सायंकाळपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगली थंडी पडली. ही थंडी पुढचे काही दिवस कायम राहील, असे वाटत होते. परंतु पहाटे दोन, तीन वाजण्याच्या सुमारास सोसाट्याचे वारे वाहू लागले. वाऱ्याचा वेग चांगलाच वाढलेला होता. सकाळपर्यंत हे वारे वाहत होते. वाऱ्यांमुळे थंडीचे प्रमाण कमी झाले. दरम्यान, सकाळी अकरा वाजेपर्यंत जिल्ह्याच्या काही भागांत वारे वाहत होते. वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात चलबिचल झाली आहे. अचानक वारे वाहतात, त्या वेळी पाऊस पडण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे भातकापणी करीत असलेल्या शेतकऱ्यांनी कापणी केलेले भातपिकाची आवराआवर सुरू केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com