Agriculture news in Marathi Big drop in soybean prices instead of edible oil prices | Page 2 ||| Agrowon

खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी घट

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021

निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर खाद्यतेल ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आटापिटा चालविला आहे. ग्राहकांचा रोष वाढत असल्याने भांबावलेल्या सरकारने शेतकरी हिताविरोधातील निर्णयांची मालिकाच लावली आहे.

पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर खाद्यतेल ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने आटापिटा चालविला आहे. ग्राहकांचा रोष वाढत असल्याने भांबावलेल्या सरकारने शेतकरी हिताविरोधातील निर्णयांची मालिकाच लावली आहे. ११ सप्टेंबरला खाद्यतेल आयातशुल्कात कपात आणि ८ ऑक्टोबरला खाद्यतेल आणि तेलबियांवर साठा मर्यादा लावण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयांमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळताना दिसत नाही. उलट या निर्णयांमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. सरकारच्या धोरणांमुळे तेलाचे दर खरच कमी झाले का? आणि शेतकऱ्यांना किती फटका बसला याचा आढावा.

सोयाबीन तेलाचा घाऊक दर ११ ऑक्टोबर २०२० रोजी प्रतिकिलो ९४.६२ रुपये होता. तर ११ सप्टेंबर २०२१ला १४७.२५ रुपये आणि ७ ऑक्टोबरला १४५.१० रुपये आणि साठा मर्यादेनंतर ११ ऑक्टोबरला हा दर १४५.८९ रुपयांवर पोहोचला. 

११ सप्टेंबरला खाद्यतेलांच्या आयातशुल्कात साडेपाच टक्क्यांची कपात केली. मात्र ११ सप्टेंबरला सोयाबीन तेलाचे घाऊक दर १५० रुपयांवरून २७ सप्टेंबरला हा दर १५५.८० रुपये किलोवर पोहोचला. म्हणजेच आयातशुल्क कपातीचा दरावर काहीच परिणाम झाला नाही हे स्पष्ट झाले. मात्र ११ सप्टेंबरला देशभरातील बाजारात समित्यांत सोयाबीनचा सरासरी दर ७००० ते ८५०० रुपयांवरून २७ सप्टेंबरला ५००० ते ७००० रुपयांवर घसरला. म्हणजेच या निर्णयामुळे सोयाबीनचे दर घसरले 

आता सरकारने ८ ऑक्टोबरला खाद्यतेल आणि तेलबियांवर साठा मर्यादा लावण्याच्या निर्णयानंतर तेलांचे दर खरच कमी झाले का, हे पाहू. गुरुवारी ७ ऑक्टोबरला घाऊक दर १४५.१० रुपये होता. तर सोमवारी ११ ऑक्टोबरला सोयाबीन तेलाचा घाऊक दर हा १४५.८९ रुपयांवर गेला. म्हणजेच तेलाचे दर हे काहीसे वाढले. तर ७ ऑक्टोबरला बाजारात सोयाबीनचे सरासरी दर ४७०० ते ६५०० रुपयांवरून ११ ऑक्टोबरला ४५०० ते ५५०० रुपयांवर आले. म्हणजेच खाद्यतेल आणि तेलबियांवर साठामर्यादेच्या निर्णयाने तेलाचे दर कमी तर झाले नाही मात्र सोयाबीनचे दर घसरले. 

इतर तेलांच्या घाऊक दरांचा विचार करता, ११ ऑक्टोबर २०२० रोजी भुईमूग तेलाचे दर प्रतिकिलो १४२.१५ रुपयांवरून आता १७३ रुपयांवर पोहोचले आहेत. मोहरी तेलाचे दर ११८.३१ रुपयांवरून १७३.९८ रुपये, सूर्यफूल तेल ११०.१७ रुपयांवरून १६०.७० रुपये, पामतेलाचे दर ८२.२२ रुपयांवरून १२५.२३ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत.

गेल्या महिन्यात, ११ ऑगस्ट रोजी खाद्यतेलांच्या घाऊक दरांचा विचार करता शेंगदाणा तेल १७२.७० रुपये प्रतिकिलो होते. मोहरी तेल १६७.२० रुपये, वनस्पती तेल १२६.७१ रुपये, सोयाबीन तेल १४७.२५ रुपये, सूर्यफूल तेल १६५ रुपये आणि पामतेल १२५.६० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात होते.

असे आहेत किरकोळ दर
केंद्रीय ग्राहक कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत तेलाचे किरकोळ दर ११ ऑक्टोबर २०२० रोजी सोयाबीन तेलाचे दर १२२ रुपये प्रतिकिलो होते. ते २७ सप्टेंबर २०२१ रोजी १५२ रुपयांवर पोहोचले. शेंगदाणा तेल १८४ रुपयांवरून १८८ रुपये, मोहरीतेल १४२ रुपयांवरून १९८ रुपयांवर पोहोचले, सूर्यफूल तेलाचे दर १४१ रुपयांवरून १८४ रुपयांवर, तर पामतेलाचे दर १०६ रुपयांवरून वाढत १२८ रुपयांवर पोहोचले.


इतर अॅग्रोमनी
वाढत्या मागणीने हरभरा दरात सुधारणापुणे : साठेबाज, व्यापारी आणि मिलर्सवर असलेली...
तूर, मूग, उडीद आयातीची प्रक्रिया सुरू;...पुणे : केंद्र सरकारने पंचवार्षिक करार करून...
रब्बीचे हमीभाव जाहीर : गव्हात ४०; हरभरा...नवी दिल्ली : केंद्र सरकारने रबी हंगामासाठी...
उडीद दरात सुधारणेची चिन्हेपुणे ः गेल्या हंगामात देशात उडदाचे उत्पादन कमी...
बेदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची...सांगली : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी...नागपूर : एफआरपीत वाढ झाली असतानाच साखरेच्या...
सोयाबीन दराची पुन्हा दहा हजारी; दर...पुणे ः गेल्या सप्ताहात सोयाबीन दरात मोठी सुधारणा...
कडधान्याचे गणित पावसावरच अवलंबूनमुंबई : देशात यंदा मॅान्सूनची सुरुवात चांगली झाली...
साखरदराचा वारू चौखूर उधळला; ३५०० चा...कोल्हापूर : गेल्या पंधरा दिवसांपासून स्थानिक...
पंढरपुरात बेदाण्यास सर्वाधिक ३०५ रुपये...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोयापेंड आयात थांबवा : राज्य सरकारचे...पुणे : जनुकीय परावर्तित (जीएम) सोयाबीनपेंडच्या...
साखर दराला झळाळी; दोन वर्षांतील...कोल्हापूर : साखरेच्या आंतरराष्ट्रीय बाजारात...
ब्राझीलला दणका; भारतीय साखर उद्योगास...जगात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांमुळे...
ग्लोबल एक्सलन्स ॲवॉर्डने अनिल जैन यांचा...जळगाव : पाणी क्षेत्रातील उत्तम कामगिरीबद्दल ‘...
साखरच्या दरात २०० रुपयांनी वाढकोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढत...
कच्ची साखरनिर्यात यंदा फायदेशीर कोल्हापूर ः येत्या साखर हंगामात आंतरराष्ट्रीय...
उत्पादक कंपनीच्या संचालक मंडळाचे कार्यप्रत्येक ‘एफपीओ’चे संचालक मंडळ पाचपेक्षा कमी...
राज्यात हंगामावर यंदा जादा साखरेचे ओझेकोल्हापूर : यंदाच्या हंगामापूर्वी देशात गेल्या...
भारतीय साखरेला थायलंडचे आव्हानकोल्हापूर : येत्या हंगामात साखरनिर्यातीसाठी...