मूग काढणी
मूग काढणी

मुगाच्या उत्पादनात मोठी घट

नांदेड ः शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाचा खंड पडल्याने नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील मुगाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यात काढणीच्या वेळी सुरू असलेल्या पावसामुळे शेंगा भिजल्याने नुकसान झाले. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने मुगाच्या पेरणीस उशीर झाला. या तीन जिल्ह्यात एकूण ५६ हजार ६९९ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली. पेरणीनंतर रिमझिम पाऊस पडत राहिल्याने अनेक भागांत पिकांची वाढ चांगली होती. कमी पाऊस असलेल्या भागात मात्र वाढ खुंटलेली होती. ऑगस्ट महिन्यात या तीन जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये २० ते २२ दिवस पावसाचा खंड पडला. त्यामुळे फुलोरा तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेतील मुगाच्या पिकांस पाण्याचा ताण बसला. परिणामी शेंगांमधील दाणे भरली नाहीत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे. एकरी जेमतेम ५० किलो ते दीड क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले.  कमी कालावधी, तुलनेने कमी खर्चात येणारे मुगाचे पीक शेतकऱ्यांसाठी किफायतशीर आहे. वेळेवर पेरणी होऊन चांगले उत्पादन मिळाल्यास बैल पोळ्यासह अन्य सणवार साजरे करण्यासोबतच शेतीकामासाठी हातात पैसा येतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाचे उशिरा आगमन, असमान वितरण, परिपक्वतेच्या अवस्थेतील खंड काळ यामुळे उत्पादनात घट येत असल्याने मुगाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. उशिरा पेरणी झाल्यानंतर ऐन काढणीच्या वेळी पाऊस आल्यामुळे शेंगा भिजून नुकसान होत आहे. यंदाही विविध कारणांनी उत्पादनात घट आल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. अनेक शेतकऱ्यांना पेरणी केलेल्या बियाणे एवढे तसेच घरच्या डाळीची गरज भागविण्यापुरतेदेखील उत्पादन झालेले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com