agriculture news in Marathi, big fall in moong production in Nanded, Parbhani, Hingoli District, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मुगाच्या उत्पादनात मोठी घट

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नांदेड ः शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाचा खंड पडल्याने नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील मुगाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यात काढणीच्या वेळी सुरू असलेल्या पावसामुळे शेंगा भिजल्याने नुकसान झाले.

नांदेड ः शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाचा खंड पडल्याने नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील मुगाच्या उत्पादनात मोठी घट आली आहे. त्यात काढणीच्या वेळी सुरू असलेल्या पावसामुळे शेंगा भिजल्याने नुकसान झाले.

यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने मुगाच्या पेरणीस उशीर झाला. या तीन जिल्ह्यात एकूण ५६ हजार ६९९ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली. पेरणीनंतर रिमझिम पाऊस पडत राहिल्याने अनेक भागांत पिकांची वाढ चांगली होती. कमी पाऊस असलेल्या भागात मात्र वाढ खुंटलेली होती. ऑगस्ट महिन्यात या तीन जिल्ह्यांतील अनेक मंडळांमध्ये २० ते २२ दिवस पावसाचा खंड पडला. त्यामुळे फुलोरा तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेतील मुगाच्या पिकांस पाण्याचा ताण बसला. परिणामी शेंगांमधील दाणे भरली नाहीत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट आली आहे. एकरी जेमतेम ५० किलो ते दीड क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले. 

कमी कालावधी, तुलनेने कमी खर्चात येणारे मुगाचे पीक शेतकऱ्यांसाठी किफायतशीर आहे. वेळेवर पेरणी होऊन चांगले उत्पादन मिळाल्यास बैल पोळ्यासह अन्य सणवार साजरे करण्यासोबतच शेतीकामासाठी हातात पैसा येतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून पावसाचे उशिरा आगमन, असमान वितरण, परिपक्वतेच्या अवस्थेतील खंड काळ यामुळे उत्पादनात घट येत असल्याने मुगाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे.

उशिरा पेरणी झाल्यानंतर ऐन काढणीच्या वेळी पाऊस आल्यामुळे शेंगा भिजून नुकसान होत आहे. यंदाही विविध कारणांनी उत्पादनात घट आल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. अनेक शेतकऱ्यांना पेरणी केलेल्या बियाणे एवढे तसेच घरच्या डाळीची गरज भागविण्यापुरतेदेखील उत्पादन झालेले नाही.


इतर अॅग्रो विशेष
सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कृत्रिम रेतन हवे नियंत्रितचकृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या...
दुष्काळ हटविण्याचा ‘जंगल मार्ग’ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत कायम दुष्काळ असतो....
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची...पुणे  ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या...
घोडेगावला कांद्यास कमाल १६५०० रुपये दरनगर  : जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा...
जमिनीच्या आरोग्याबाबत ३५१ गावे होणार...पुणे  ः शेतकऱ्यांना जमीन आरोग्य तपासणीचे...
शिरोळमधील पूरबाधित जमिनींमध्ये वाढले...कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी दक्षिण...
रुईच्या टक्‍केवारीवर ठरणार कापसाचा दर...वर्धा ः कापसातील रुईची टक्‍केवारी विचारात घेत...
राज्यात दोन लाख क्‍विंटल कापूस खरेदीअमरावती ः खासगी बाजारात कापसाला कमी दर मिळत...
राज्यातील दूध संकलन ३० लाख लिटरने घटलेसोलापूर ः ओल्या दुष्काळामुळे ओढवलेल्या आपत्तीने...
मातीची धूप थांबविण्यासाठी जागरूक रहा :...परभणी ः शेतीसाठी माती हा सर्वांत महत्त्वाचा घटक...
पणज गावाने आणली केळी पिकातून सुबत्ताअकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पणज हे छोटे गाव...
संगेवाडीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला...सोलापूर  : दोन महिन्यांपुर्वी झालेल्या...
माणुसकीलाच काळिमापशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची...
श्रमसधन उद्योग उभारणीवर हवा भरआजच्या घडीला सरकार कृषी संशोधन आणि विकास...
रोपवाटिका व्यवसायाने दिला सक्षम आधारदहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरी न मिळाल्याने...
मराठवाड्यात नऊ लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणीलातूर : अतिपावसाने खरीप पिके हातची गेलेल्या...
औरंगाबादच्या मोसंबी कलमांची मध्य...महाराष्ट्रातील अत्यंत गोड, रसाळ मोसंबीने आता मध्य...
बी-हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस...सोलापूर : साखरेचे अतिरिक्‍त उत्पादन टाळून इंधन...
कृत्रिम रेतन व्यवसाय येणार कायद्याच्या...पुणे : राज्यातील गाय-म्हशींच्या कृत्रिम रेतनाचा...