agriculture news in Marathi big loss in cotton production Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कापूस उत्पादनात मोठी घट, पीक परवडेना

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली. माझी जमीन पाण्याचा निचरा करणारी असतानादेखील हवे तेवढे बोंडे लागली नाहीत. आता वेचणी पूर्ण होत आली आहे.

जळगाव ः अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली. माझी जमीन पाण्याचा निचरा करणारी असतानादेखील हवे तेवढे बोंडे लागली नाहीत. आता वेचणी पूर्ण होत आली आहे. पण उत्पादन फक्त एकरी पाच क्विंटलपर्यंतच हाती आले, पीक परवडेल की नाही, अशी स्थिती झाली आहे, अशी व्यथा कोळन्हावी (ता.यावल, जि.जळगाव) येथील शेतकरी देवानंद विठ्ठल सोळंके मांडत होते.

देवानंद म्हणाले, की तापी नदीकाठी माझे शेत आहे. गेल्या वर्षीदेखील अतिपाऊस होता. यंदाही तशीच स्थिती आहे. सुरवातीला स्थिती बरी वाटत होती. माझा कापूस जूनमध्ये लागवडीचा होता. चांगली वाढ सप्टेंबरपर्यंत दिसत होती. बोंडे जोमात होती. पाते, फुले लागत होती. पीक चांगले दिसत असल्याने मीदेखील कीटकनाशके व इतर बाबींवर खर्च केला. परंतु सप्टेंबरपासून पाऊस सुरू झाला.

ऑक्टोबरमध्येही अतिपाऊस झाला. या पावसात पिकाची अतोनात हानी झाली. बोंडे खराब झाली. पहिली वेचणी जोमात झाली असती. कारण पीक सप्टेंबरपूर्वी चांगले दिसत होते. पावसासोबत वादळी एकदा आले. अतिपावसाने तणही एवढे वाढले की, तणनाशकांचा उपयोग करण्याची स्थिती तयार झाली. मजूर मिळत नाहीत. आमच्या भागात माझीच नाही, तर इतर शेतकऱ्यांचीदेखील अशीच स्थिती आहे. 

एकरी आठ ते नऊ क्विंटल उत्पादन आले असते, पण आता फक्त पाच क्विंटल उत्पादन हाती आले आहे. पीक आणखी महिनाभर राहीले असते. परंतु त्यात वेचणीयोग्य बोंडेच तयार नाहीत. त्यामुळे ते उपटून फेकण्याची वेळ आली आहे. जेवढा खर्च केला, तेवढेच उत्पादन हाती येईल, अशी स्थिती झाली आहे. मजुरांची समस्या आहे. शेतकरी काय करणार, असा हतबल प्रश्‍नही सोळंके यांनी केला.

सनपुले (ता.चोपडा) येथील किरण पाटील म्हणाले, की ऑक्टोबरच्या पावसाने मोठी हानी झाली. एकरी चार क्विंटलही उत्पादन येणार नाही. कापसाचे दर सध्या ४३०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. शासकीय खरेदी सुरू नाही. एकरी खर्च १५ हजार रुपयांपर्यंत आला आहे. परंतु उत्पादन लक्षात घेता फक्त पाच ते सात हजार रुपये एकरी सुटतील. चार महिने पिकाचा लहान मुलासारखा सांभाळ केला. आता पिकाची डोळ्यासमोर माती झाली आहे. पंचनामे झाले. पण मदत दिवाळीपूर्वी मिळणे अपेक्षित आहे. कारण पुढे रब्बीसाठी हाती निधी हवा आहे. हा निधी बँका देणार नाहीत. घरात शेतमाल नाही. दिवाळीदेखील कशी आनंदात साजरी होईल, असाही मुद्दा शेतकरी पाटील यांनी उपस्थित केला.

कापसाची लागवड अधिक, फटकाही मोठा
जिल्ह्यात कापसाची सर्वाधिक पाच लाख २५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. पूर्वहंगामी कापूस पिकाची त्यात सुमारे ६५ हजार हेक्टरवर लागवड आहे. तर गिरणा पट्ट्यात कापूस पिकाला गिरणा धरणाचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. परंतु पीकच हातचे गेले आहे. कोरडवाहू पिकातही हवी तशी वाढ हलक्या, मुरमाड जमिनीत नाही. कापूस पिकाचे सव्वादोन लाख हेक्टरवर ६० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. तर मुगाचे सुमारे १२ हजार हेक्टरवर, उडदाचे नऊ हजार हेक्टरवर ८५ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. सोयाबीनचेदेखील सुमारे ११ हजार हेक्टरवर अतिपावसाने नुकसान  झाले. यासंदर्भात पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण झाल्याची माहिती मिळाली.

प्रतिक्रिया
माझ्या चार एकरातील सोयाबीन पिकाची अतोनात हानी झाली आहे. शेतात पीकच दिसत नाही. काय करावे, अशी स्थिती आहे.
- प्रमोद पाटील, शेतकरी, पळासखेडा (जि.जळगाव)

कापूस पीक आता हिरवे होत आहे. पण त्यात गुलाबी बोंडअळी येत आहे. पीक काढावे लागेल. परतीचा पाऊस आला नसता तर चांगले उत्पादन आले असते. पंचनामे झाले आहे. सरकारने मदत घोषित केली. मदतही तोकडी असून, मदतीची प्रतीक्षा आहे.
- अनिल सपकाळे, करंज, जि. जळगाव


इतर अॅग्रो विशेष
ढगाळ वातावरणामुळे आंबा, काजू बागायतदार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले...
आश्वासक रब्बीही ठरतोय आव्हानात्मकखरीप हंगामात झालेली अतिवृष्टी आणि लांबलेल्या...
खासगीकरणाचा वारू किती उधळणार?सरकारने उद्योगधंद्यात सामील असता कामा नये, अशी...
खानदेशात पपई दराचा पुन्हा तिढाजळगाव : खानदेशात पपईचे पीक बऱ्यापैकी काढणीवर आले...
आंदोलक शेतकऱ्यांचा दिल्लीत तळनवी दिल्ली  : दिल्ली पोलिसांनी परवानगी...
राज्यातील आठ जिल्ह्यांत बिबट्याची दहशतनगर : कोरोनामुळे, त्यानंतर पावसाने अडचणीत आलेल्या...
आई-वडिलांकडे दुर्लक्ष केल्यास ३० टक्के...नगर ः आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या जिल्हा परिषद...
कापूस गाठींच्या दरात सुधारणाजळगाव ः जगातील वस्त्रोद्योग ९५ ते ९७ टक्के...
सोयाबीनचे ३६ लाख क्विंटल बियाणे...पुणे : राज्यातील शेतकरी बाजारातून दहा लाख क्विंटल...
काही ठिकाणी हलक्या सरी पुणे : निवार चक्रिवादळ निवळत असताना जमिनीवरून...
सामाजिक दायीत्वातून जीवनात फुलले ‘...आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी आणि...
सोयाबीन दरात मंदीची शक्यता नाही पुणे ः केंद्र सरकारने गुरुवारी (ता.२७) कच्च्या...
राज्यात १०९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन पुणे : राज्यात चालू गाळप हंगामात आतापर्यंत १४९...
शेतकरी मोर्चावर केंद्राकडून दडपशाही :...नगर : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या...
सव्वा दोन हजार कोटी रब्बीसाठी कर्जवाटप पुणे : रब्बी हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना १६...
हिंद महासागरात कमी दाबाचे क्षेत्र पुणे:  ‘निवार’ चक्रीवादळ निवळत नाही तोच...
ऐंशी प्रकारचा प्रक्रियायुक्त कोकणमेवासिंधुदुर्ग जिल्ह्यातील दहिबाव (ता.देवगड) येथील...
मार्केटिंग, ब्रॅंडिंगद्वारे अळिंबी...बेलखेड (जि. अकोला) येथील विलास व छायाताई या कुयटे...
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...