देशात अभूतपूर्व कांदाटंचाई

Onion scarcity
Onion scarcity

पुणेः देशभरातील प्रमुख कांदा बाजारपेठांमध्ये कांद्याने जोरदार उसळी घेतली आहे. कांद्याची आवक कमालीची घटली असून अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात तेजीचा उच्चांक गाठला गेला आहे. कांदा आयातीस मंजुरी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा कांदा बाजारावर काडीमात्रही परिणाम झालेला नाही. ऑक्टोबरच्या पुनर्लागणीची रोपे सप्टेंबरच्या पावसात झोडपली गेली. त्याच प्रभाव जानेवारी महिन्यातील बाजारभावावरही दिसेल. थोडक्यात पुढील तीन महिने कांद्याच्या दरातील तेजीचा वारू चौखुर उधळण्याची चिन्हे आहेत.

  •  महाराष्ट्रातील प्रमुख कांदा बाजार समित्यांत चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याचे भाव प्रतिक्विंटल ९ हजार ६०० रुपयांपर्यंत पोचले.
  •  लासलगाव विंचूर बाजार समितीत प्रतिक्विंटल ८०७० रुपये भावाची नोंद झाली तर उमराणे बाजार समितीत घोडेगाव (जि. नगर) सरासरी ९६०० बाजारभाव नोंदला गेला. हंगामी सरासरीच्या तुलनेत नव्या व जुन्या आवकेचे प्रमाण अत्यल्प आहे.
  •  ऑगस्टच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात देशातील प्रमुख कांदा उत्पादक विभागात झालेल्या अतिवृष्टीचा प्रभाव आजच्या बाजारावर दिसतोय.नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा ते संपूर्ण डिसेंबर महिन्यात नव्या कांद्याचा पुरवठ्यात नीचांकी घट दिसतेय. देशात २१ नोव्हेंबर रोजी केवळ २६ हजार टन कांदा आवक होती. दैनंदिन गरजेच्या तुलनेत ६० टक्क्यांपर्यंत आवक घटल्याचा परिणाम म्हणून कांदा दरात उच्चांकी वाढ झाली आहे. 
  •  जूना उन्हाळ कॅरिओव्हर नाममात्र उरला आहे.
  •  आयातीत कांद्याची मात्रा बाजारभावावर प्रभाव टाकण्याच्या दृष्टीने दुर्लक्षणीय आहे. सरकारने २० नोव्हेंबरला सव्वा लाख टन आयातीस मंजुरी दिल्याच्या बातमीकडे बाजाराने दुर्लक्ष केले. ६ हजार रुपयांचा बाजार आजघडीला ९६०० हजारांवर पोचलाय.
  •  इजिप्त, तुर्कस्थान आदी देशांमध्ये आखातासह भारताची गरज भागवेल इतके निर्यातयोग्य अधिक्य (एक्स्पोर्टेबल सरप्लस) नाही. 
  •  ऑक्टोबरच्या पुनर्लागणीची रोपे सप्टेंबरच्या पावसात झोडपली गेली. त्याच प्रभाव जानेवारी महिन्यातील बाजारभावावरही दिसेल.
  •  सध्याच्या तुलनेत जानेवारीतील पुरवठ्यात सुधाणा असेल. मात्र, दैनंदिन मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असेल, कारण रोपे खराब झाल्याची माहिती मिळत आहे.
  • उपायानंतरही दर चढेच

  • निर्यातबंदी व आयातीचा प्रभाव शून्य
  • ऑगस्ट-सप्टेंबरमधील अतिवृष्टीने नोव्हेंबर-डिसेंबरमधील पुरवठा साखळी खंडित
  • भारतातील कांदा तुटवडा कमी करेल इतका अतिरिक्त (सरप्लस) माल जगात कुठल्याही देशाकडे नाही.
  • एकाच वर्षात ठोक दर प्रतिक्विंटल ३०० रुपये या नीचांकावरून ९ हजार ६०० रुपयांच्या उच्चांकावर.
  • ऑक्टोबरमधील लागणी पावसात बाधित झाल्याचा प्रभाव जानेवारीतही शक्य.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com