Agriculture news in Marathi Big reduction in edible oil import duty | Page 4 ||| Agrowon

खाद्यतेल आयातशुल्कात मोठी कपात

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 ऑक्टोबर 2021

कच्च्या सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातशुल्कात तब्बल १९.२५ टक्के आणि कच्च्या पाम तेलाच्या आयात शुल्कात १६.५० टक्के कपात सरकारने केली आहे.

पुणे : काही केल्या खाद्यतेलाचे दर कमी होत नाही म्हटल्यावर केंद्र सरकारने बुधवारी (ता. १३) सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या आयातशुल्कात मोठी कपात केली. कच्च्या सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयातशुल्कात तब्बल १९.२५ टक्के आणि कच्च्या पाम तेलाच्या आयात शुल्कात १६.५० टक्के कपात सरकारने केली आहे.

केंद्र सरकारने वर्षभरात तब्बल तीन वेळा आयातशुल्कात कपात केली आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात येण्याच्या काळातच सरकारने शेतकरीविरोधी निर्णयांचा धडाका लावला आहे. मागील एक महिन्याचाच विचार केला, तर ११ सप्टेंबरला खाद्यतेल आयातशुल्क कपात, ८ ऑक्टोबरला साठा मर्यादा व १३ ऑक्टोबरला पुन्हा आयातशुल्क कपात असे निर्णय घेण्यात आले आहेत. आता एेन दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांचं दिवाळ काढायचं ठरवलं का, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत आहेत.

सरकारने आरबीडी (रिफाइंड, ब्लीच्ड आणि गंधरहित) पामोलीनच्या शुल्कात १६.५ टक्के, आरबीडी पाम तेलाच्या शुल्कात १६.५ टक्के, रिफाइंड सूर्यफूल तेलाच्या आयातशुल्कात १९.२५ टक्के, रिफाइंड सोयाबीन तेलाच्या आयातशुल्कात १६.५० टक्के कपात केली आहे. सरकारने आयातशुल्कात कापत केल्यानंतर सोयाबीन तेलाचे दर १९ हजार ३५१.९५ रुपये प्रतिटनाने कमी झाले. तर कच्च्या पामतेलाचे दर १४ हजार ११४.२७ रुपयांनी आणि पामोलीनचे दर १४ हजार ५२६.४५ रुपयांनी घटले आहेत.  

मलेशियात पाम तेलाचे दर वाढले
बुधवारी (ता. १३) केंद्र सरकारने आयात शुल्कात कपात केल्यानंतर जागतिक आणि देशांतर्गत खाद्य तेल आणि तेल बियाण्याच्या वायद्यात चढ-उतार नोंदवले. भारत सरकारचा निर्णय खाद्य तेलाच्या निर्यातदार देशांना फायदेशीर असल्याने मलेशियातील खाद्य तेलाच्या वायद्यात बुधवारी १६० रिंगीटनी सुधारणा झाली. तर भारतातील एनसीडीईएक्सवरील सोयाबीनचे वायदे सुमारे अडीच टक्क्यांनी घटले. 

 शुल्क आणि कृषी सेसमध्ये कपात
केंद्राने आयातशुल्क कपात करताना मूलभूत शुल्क आणि कृषी पायाभूत सुविधा आणि विकास सेसमध्ये कपात केली आहे. सरकारने कच्चे पाम तेल, कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील मूलभूत शुल्क शून्यावर आणले आहे. तर पामोलिन, आरबीडी पाम तेल, रिफाइंड सोयाबीन तेल आणि रिफाइंड सूर्यफुलावरील शुल्क ३२.५ टक्क्यांवरून १७.५ टक्क्यांवर आणले आहे. तर कच्चे पाम तेलावरील कृषी पायाभूत सुविधा आणि विकास सेस २० टक्क्यांवरून ७.५ टक्यांवर आणि कच्चे सोयाबीन तेल आणि कच्चे सूर्यफूल तेलावरील सेस २० टक्क्यांवरून ५ टक्क्यांवर आणले आहे.

प्रतिटन खाद्यतेलात झालेली कपात (रुपये/प्रतिटन)
तेलाचा प्रकार नवे शुल्क जुने शुल्क कपात
कच्चे पाम तेल ८.२५ २४.७५ १६.५०
पामोलिन १९.२५ ३५.७५ १६.५०
आरबीडी पाम तेल १९.२५ ३५.७५ १६.५०
कच्चे सोयाबीन तेल ५.५० २४.७५ १९.२५
रिफाइंड सोयाबीन तेल १९.२५ ३५.७५ १६.५०
कच्चे सूर्यफूल तेल ५.५० २४.७५ १९.२५
रिफाइंड सूर्यफूल तेल १९.२५ ३५.७५ १६.५०

या क्षेत्रात दीर्घकालीन धोरण आखण्याची गरज आहे. या धरसोडीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे आणि एकूणच संबंध तेलबिया प्रक्रिया उद्योगाचे नुकसान होत आहे. खरेतर व्यापाऱ्यांना आयात निर्यातीचे निर्णय घेण्यासाठी मुभा दिली पाहिजे. सरकारी हस्तक्षेप कमी झाला पाहिजे. या नंतर शेतकरी कोणत्या पिकांची लागवड करावी याचा निर्णय घेण्यास सक्षम होतील.
- अनिल घनवट, शेतकरी नेते

केंद्र सरकारने खाद्य तेलाच्या वाढलेल्या किमती कमी करून ग्राहकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळातील खाद्य तेलाची मागणी लक्षात घेता खाद्य तेलाच्या आयात शुल्कात कपात केली आहे. पण या निर्णयामुळे सोयाबीन आणि भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान 
सहन करावे लागणार आहे. सध्या सोयाबीन आणि भुईमुगाची बाजारात आवक सुरू असताना आयात शुल्क कपातीचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.
- बी. व्ही. मेहता, कार्यकारी संचालक, 
सोव्हंट एक्स्ट्रॅक्टर असोसिएशन ऑफ इंडियाचे

आज सरकारने खाद्य तेलाच्या आयातशुल्कात कपात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन स्वस्त दरात विकावे लागणार आहे. सध्या सोयाबीनची कापणी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागणार आहे.
- दिनेश सोमाणी, शेतीमाल बाजार विश्‍लेषक


इतर अॅग्रो विशेष
सरकारी अनुदान नसतानाही  यंदा साखर...पुणे ः भारतात उपलब्ध असलेला जादा ऊस लक्षात घेता...
कृषिपंपांचा वीजपुरवठा तोडू नये, अन्यथा...कोल्हापूर : कृषिपंपाचे रात्रीचे १० तास...
कृषिपंपाचे तोडलेले वीजकनेक्शन पूर्ववतबुलडाणा ः शेतकऱ्यांच्या कृषिपंपाचे तोडलेले...
निविष्ठा परवान्यांमधील ‘दुरूस्ती’ आता...पुणे ः गुणनियंत्रण विभागातील गैरव्यवहाराला आळा...
ऊसतोड वजावट रद्द करावी पुणे : राज्यात यंत्राच्या साहाय्याने होणारी...
कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची...पुणे : किमान तापमानाचा पारा घसरल्याने गारठा वाढला...
गोदावरी-वैनगंगा नदीजोड प्रकल्प अद्याप...नागपूर : महागाई आणि भूखंडाच्या दरापेक्षाही वेगाने...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांच्या...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द झाल्यानंतर आता मोदी...
कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचे...नवी दिल्ली ः संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी...
राजस्थानमधील शेतकऱ्यांची  मोहरी आणि...पुणे ः रब्बी हंगाम २०२०-२१ मधील मोहरी आणि गव्हाला...
कृषी विजबिले अवास्तवअकोला ः ग्रामीण भागात सध्या एकीकडे रब्बीची लगबग...
अवकाळीच्या सावटामुळे द्राक्ष पट्ट्यात...नाशिक : गेल्या काही वर्षांपासून पूर्वहंगामी...
हापूस आंब्याचा हंगाम धोक्यातरत्नागिरी ः कोरोनातील बिकट परिस्थितीचा सामना करत...
अभ्यासपूर्ण व्यवस्थापनातून दर्जेदार...जळके (ता.जि. जळगाव) येथील राजेश पाटील यांनी केळी...
आदर्श असावा तर खडतरे कुटुंबासारखामुक्त गोठा पद्धत, नेटके व्यवस्थापन, कुटुंबाची एकी...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : राज्याच्या किमान तापमानाचा पारा १५...
शेवगा २००० रुपये प्रतिदहा किलोपुणे ः पुणे बाजार समितीमध्ये रविवारी (ता.२८)...
धुळीमुळे शेतकऱ्यांचे ‘पांढरे सोने’...गुमगाव, जि. नागपूर : कोतेवाडा, सोंडेपार शिवारातील...
तांदूळ महागणार ; अवकाळी पावसामुळे...नागपूर : नवीन तांदळाच्या हंगामास सुरुवात झाली आहे...
कामे पूर्ण केलेल्या शेतकरी गटांचे ...पुणेः समूह शेती योजनेत भाग घेतलेल्या शेतकरी...