agriculture news in Marathi big response for agriculture exhibition Maharashtra | Agrowon

अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनास अलोट गर्दी..! आज शेवटचा दिवस..

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 डिसेंबर 2019

औरंगाबाद : २६ लाखांच्या अजस्त्र ‘बॅक हो लोडर’पासून ते बाराशे रुपयांच्या ‘घोंगडी’पर्यंतची सुरू असलेली विक्री, शेतकरी महिलांपासून ते अगदी महाविद्यालयीन युवकांची माहिती घेण्यासाठी असलेली धडपड आणि सर्वच स्टॉल्सवर उसळलेली शेतकऱ्यांची गर्दी... असे थक्क करणारे चित्र रविवारी (ता. २९) दिवसभर येथे भरलेल्या ‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनाचे होते. सोमवारी (ता.३०) कृषी जागराचा शेवटचा दिवस आहे. 

औरंगाबाद : २६ लाखांच्या अजस्त्र ‘बॅक हो लोडर’पासून ते बाराशे रुपयांच्या ‘घोंगडी’पर्यंतची सुरू असलेली विक्री, शेतकरी महिलांपासून ते अगदी महाविद्यालयीन युवकांची माहिती घेण्यासाठी असलेली धडपड आणि सर्वच स्टॉल्सवर उसळलेली शेतकऱ्यांची गर्दी... असे थक्क करणारे चित्र रविवारी (ता. २९) दिवसभर येथे भरलेल्या ‘अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनाचे होते. सोमवारी (ता.३०) कृषी जागराचा शेवटचा दिवस आहे. 

‘सकाळ-अॅग्रोवन’तर्फे औरंगाबादमध्ये आयोजिलेल्या चार दिवसीय कृषी प्रदर्शनाला रविवारी (ता.२९) अक्षरशः कृषी जत्रेचे स्वरूप आले. मराठवाडा, विदर्भच नव्हे, तर अगदी नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, धुळे आणि कोकणातून देखील शेतकरी या ज्ञानमेळाव्यात सहभागी झाले. या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक पारस ग्रुप असून महाफिड फर्टिलायझर्स, एमव्हीएस अॅक्मे मॅट, बसवंती मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्र, एमआयटी कॉलेज (औरंगाबाद), गरवारे टेक्निकल फायबर्स आणि महाऊर्जा सहप्रायोजक आहेत. 

मनात घोळत असलेला कोणताही मुद्दा विचारावा आणि भरपूर खरेदी करावी, असे चित्र महिला शेतकऱ्यांचे होते. कंपन्या किंवा शास्त्रज्ञांकडून माहिती गोळा करून शेतीमधील अडचणी दूर करून शास्त्रोक्त नियोजनातून व्यावसायिक शेती कशी करता येईल, यासाठी ग्रामीण भागातील युवक धडपड करीत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजुला थेट शेतकऱ्याच्या परडीतील अस्सल गावरान शेतमाल खरेदी करण्यासाठी शहरी ग्राहकांच्या रांगा लागल्या. त्यामुळे कृषी विभागाने आत्मा अंतर्गत स्थापन केलेल्या बचत गटाच्या स्टॉल्सवर झुंबड उडाली. 

प्रदर्शनात शेतकऱ्यांना दाखविण्यासाठी २६ लाखांचा ‘बॅक हो लोडर’ घेऊन आलेले बुल कंपनीचे प्रतिनिधी मनोज कदम म्हणाले की, “आमच्या नजरेतून अॅग्रोवनचा हा कृषि जागर १०० टक्के यशस्वी झालेला आहे. आम्ही केवळ दाखविण्यासाठी ही महाकाय कृषियंत्रे येथे आणली आणि चक्क बुकिंग केले जात आहेत. नव तंत्राचा वापर करून घेण्यासाठी ग्रामीण भागातील युवक किती आतूर झाले आहेत हेच यातून दिसून येते. येथे आलेला शेतकरी दोन हजारांच्या फवारणी यंत्राची आणि २५ लाखांच्या डोझर यंत्राची देखील तितक्याच तळमळीने माहिती घेत असल्याचे चित्र आहे.” 

जालना भागात मेंढ्यांच्या केसापासून घोंगडी तयार करणारे दत्ता वाळके म्हणाले की, “शहरीकरणाच्या वाटचालीत शेतकऱ्यांची जुनी घोंगडी अजिबात मागे पडलेली नाही. या प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकरी किंवा शहरवासीयदेखील आमच्या स्टॉलवर येतात. माहिती घेतात आणि हवी तशी घोंगडीही विकत नेतात.” 

अवजारे व यंत्रे विभागात प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून तोबा गर्दी आहे. छोट्या ट्रॅक्टरपासून ते हातचलित कोळप्यापर्यंत सर्व अवजारांची माहिती शेतकरी बारकाईने घेत आहेत. प्रदर्शन पाहून पुन्हा परिसंवादाला हजेरी लावणारे शेतकरीही मोठ्या संख्येने दिसतात.

सुभाष शर्मा यांचे नैसर्गिक शेतीचे अनुभव ऐकण्यासाठी शेकडो किलोमीटरचा प्रवास करून आलेले शेतकरी सभागृहात दिसत होते. ते प्रत्येक मुद्दा तन्मयतेने ऐकून टिपण घेत होते. पाणीटंचाई हा शेतकऱ्यांसाठी कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी साचून पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कसा वापर करता येईल, अशी तळमळ असलेले शेतकरी शेततळ्याचा प्लॅस्टिक कागद, ठिबक संच, सबमर्सिबल पंप, सोलरपंप याची माहिती व विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर गर्दी करीत होते. 

प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतीपयोगी पुस्तकांचीही भरपूर खरेदी शेतकरी करीत आहेत. याशिवाय कृषी विद्यापीठांची दैनंदिनी, माहिती पत्रके आवर्जून घेतली जात आहेत. तापमान बदलाचे शेतीवर भयावह परिणाम होत असताना राज्य शासनाने वेळीच गरज ओळखू शेतकऱ्यांसाठी मराठवाडयासह निवडक गावांमध्ये सुरू केलेल्या पोकरा प्रकल्पातील योजनांची माहिती घेण्यासाठीदेखील शेतकरी गर्दी करीत होते.

या अभ्यासपूर्ण प्रदर्शनात दिवसभर भटकंती केल्यानंतर सहकुटुंब सेल्फी काढून घेण्यात शेतकरी मग्न असल्याचे अनोखे चित्र प्रवेशद्वाराजवळ दिसत होते. दरम्यान, आज (ता.३०) प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उदय देवळाणकर यांचे पीकपद्धती बदलातून किफायतशीर शेती याविषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान होणार आहे. 

शेतकऱ्यांमध्ये रंगला संवाद 
जालन्याच्या फुलंब्री भागातील बोरगावमधून सेंद्रिय डाळ विकण्यासाठी आलेले शेतकरी दादाराव शेजवळ म्हणाले की, “या प्रदर्शनात आमची सेंद्रिय उत्पादने विकली जात आहेतच; पण त्यापेक्षाही आमचेच भाऊबंद असलेले शेतकरी अनेक प्रकारचे प्रश्न विचारीत शंकानिरसन करीत असल्याचे पाहून आम्हाला आनंद होतो आहे. सेंद्रिय शेती कशी करता, काय वापरता, कोणते खत टाकतात, रासायनिक पद्धत आणि सेंद्रिय पद्धत यामुळे उत्पादनात काय फरक पडतो, तुम्ही सर्टिफिकेशन कसे करता, इथे आणलेला माल सेंद्रियच आहे हे कशावरून असे नानाविध प्रश्न शेतकरी आम्हाला विचारीत आहेत. आम्हीदेखील त्यांना भरपूर माहिती देत आहोत.” 
 


इतर इव्हेंट्स
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : अद्ययावत...औरंगाबाद ः ‘‘‘सकाळ-ॲग्रोवन’ने आयोजित केलेल्या...
नैसर्गिक शेतीची पंचसूत्री अमलात आणा :...औरंगाबाद ः माती, पाणी, जातिवंत बियाणे, पीक नियोजन...
मधमाशीपालन उद्योगात तरुणांना संधी -संजय...औरंगाबाद ः महाराष्ट्रात मधमाशी पालन उद्योगास...
अॅग्रोवन’ कृषी प्रदर्शनास अलोट गर्दी...औरंगाबाद : २६ लाखांच्या अजस्त्र ‘बॅक हो लोडर’...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : शेतकऱ्यांचा...औरंगाबाद ः माती आणि पाणी परीक्षणाविषयी...
जादा उत्पन्नासाठी शेतमालाचे मूल्यवर्धन...औरंगाबाद ः शेतीमालाच्या उत्पादनामध्ये जितकी काळजी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : पारस, एमव्हीएस...पारस ग्रुपच्या स्टॉलवर शेतकऱ्यांची गर्दी ...
कृषी विद्यापीठाने मांडले एकात्मिक...औरंगाबाद ः प्रदर्शनामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा...
कृषी विभागाच्या दालनावर योजनांसह कीड-...औरंगाबाद ः कृषी प्रदर्शनामध्ये जिल्हा परिषदेचा...
पायाभूत सुविधा दिल्यास कर्जमाफीची गरज...औरंगाबाद : कर्जमाफी झाली तरी पुढच्या हंगामात...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : यंत्रे, अवजारे...औरंगाबाद ः मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन :शेतकरी गट, बचत...औरंगाबाद ः सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली...
अॅग्रोवन कृषी प्रदर्शन : नवे तंत्रज्ञान...सकाळ - ॲग्रोवनच्या वतीने आयोजित भव्य कृषी...
पोपटराव पवार यांच्या हस्ते आज उद्‍घाटन औरंगाबाद: ‘सकाळ ॲग्रोवन’च्या भव्य कृषी...
औरंगाबाद येथे २७ पासून ॲग्रोवन कृषी...पुणे  : शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान व माहितीचा...
एकात्मिक कीडरोग व्यवस्थापनातून...नाशिक : पॉलिहाउस मध्ये वर्षानुवर्ष एकच पीक...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
शाश्वतता, जागतिक दर्जा, विस्तारीकरण ...पुणे ः कोणताही उद्योग शाश्वत असायला हवा, तुमची...
‘सकाळ रिलीफ फंडा’ची पूरग्रस्तांना एक...पुणे ः कोल्हापूर, सांगली, सातारा भागांत...
पाणी व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यास...नाशिक : जमिनीची सुपीकता वाढवण्याबरोबर योग्य पाणी...