पलटी नांगर योजनेसाठी मोठा प्रतिसाद

पलटी नांगर योजनेसाठी मोठा प्रतिसाद
पलटी नांगर योजनेसाठी मोठा प्रतिसाद

जळगाव : जिल्ह्यात कृषी यांत्रिकी उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेसह राज्याच्या कृषी विभागाने पलटी नांगर योजना सुरू केली आहे. मात्र सर्वंच अर्जदारांना या योजनेतून नांगर मिळणार नसल्याची स्थिती आहे. 

राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे कृषी यांत्रिकीकरण योजनेतून या संदर्भात कार्यवाही सुरू आहे. जिल्हा परिषदेने कृषी विभागाला कृषी योजनांसाठी स्वनिधीतून दिलेल्या निधीतून पलटी नांगरचे अनुदान देण्याची कार्यवाही सुरू आहे. जिल्हा परिषदेकडे सुमारे ३५० अर्ज आले आहेत. राज्य शासनाच्या कृषी विभागाकडेही या नांगरसंबंधीची मागणी आहे, परंतु जिल्हा परिषदेकडून या योजनेसाठी १२ लाखांपर्यंतच खर्च होईल. अर्थातच जवळपास ५० अर्जदारांना अनुदान देता येईल. मग उर्वरित ३०० अर्जदार शेतकरी या योजनेपासून वंचित राहतील.

जिल्हा परिषदेने सर्व कृषी योजनांसाठी दीड कोटी रुपयांची तरतूद स्वनिधीतून केली. त्यातून फवारणीचे पंप, एचडीपीई पाइप, कृषिपंप आदी जवळपास १२ योजनांवर खर्च करायचा आहे. एकट्या पलटी नांगर योजनेसाठी पूर्ण दीड कोटी रुपये निधी वापरता येणार नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेने ज्या योजनेसंबंधीचा निधी अखर्चित राहील, तो पलटी नांगर योजनेवर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु अखर्चित निधीची माहिती मार्च २०१९ नंतर समोर येईल. त्यानंतर संबंधित योजनेचा निधी पलटी नांगरसाठी केला जाईल, तोपर्यंत अर्जदारांना प्रतीक्षा करावी लागेल. 

पलटी नांगर योजनेचे अनुदान २५ हजार रुपये आहे. बाजारात पलटी नांगर एक लाख रुपयांपर्यंत मिळतो. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अनुदान तोकडे आहे. अनुदान किमान एका नांगरसाठी ४० हजार रुपये असावे, अशी शेतकऱ्यांनी मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com