Agriculture news in marathi Big response to 'Bandh' across the country | Agrowon

देशभरात ‘बंद’ला मोठा प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
बुधवार, 9 डिसेंबर 2020

केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांनी मंगळवारी (ता. ८) पुकारलेल्या ‘भारत बंद’ला  प्रतिसाद मिळाला. पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्‍चिम बंगालमध्ये  जनजीवन विस्कळीत झाले.

नवी दिल्ली  : केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी संघटनांनी मंगळवारी (ता. ८) पुकारलेल्या ‘भारत बंद’ला देशाच्या विविध भागांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, पश्‍चिम बंगाल आदी मोठ्या राज्यात बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले.

ईशान्येकडील राज्यांत बंदला प्रतिसाद मिळाला नाही. दिल्लीसह महत्त्वाच्या शहरांसह ग्रामीण भागात बंदचा परिणाम दिसून आला. चंडीगड : भारत बंदला पंजाबमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राज्यभरात व्यापारी संकुले, दुकाने, किरकोळ, घाऊक विक्री बंद होती. बाजार समित्या आणि शेतमाल विक्री पूर्णपणे बंद होती. पेट्रोलियम डीलरनी पाठिंबा दिल्यामुळे राज्यातील सुमारे ३ हजार ४०० पंप बंद होते. आंदोलनाला पाठिंबा म्हणून सुमारे पाच हजार सरकारी कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा घेतल्याने सर्व सरकारी आस्थापने बंद होती. दरम्यान, भाजप-जेजेपीची संयुक्तपणे सत्तेवर असलेल्या हरियानामध्ये विरोधी पक्ष काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय लोक दलाने बंदला पाठिंबा दिल्यामुळे सकाळपासूनच रस्त्यांवरील रहदारी कमी झाली होती. अनेक ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात आल्यामुळे रस्ते बंद आहेत. 

पंजाब, हरियानामधून शेतकऱ्यांचा ओघ
 भारत बंदच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. ८) पंजाब, हरियानामधून मोठ्या संख्येने शेतकरी दिल्ली-हरियानाच्या सिघु सीमेवर दाखल झाले आहेत. शेतकरी टॅक्टर, चारचाकी वाहनांमधून आले. आंदोलन करणाऱ्यांसाठी अन्नधान्य, खाण्‍यापिण्याचे साहित्य घेऊन ही वाहने सीमेवर दाखल झाली आहेत. त्यामुळे आंदोलक शेतकऱ्यांची संख्या सिंघु सीमेवर वाढली आहे. गव्हाचे पीठ, मसूरसह इतर डाळी, तेल, दूध, साबण, टूथपेस्ट आदी साहित्य घेऊन शेतकरी आपल्या वाहनांसह दाखल झाले आहेत.

पश्‍चिम बंगालमध्ये धरणे
कोलकाता : पश्‍चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) वतीने बंदला पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग घेतला. टीएमसीने तीन दिवस चालणाऱ्या धरणे आंदोलनाची आज (ता.८) सुरुवात केली. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कृषी कायदे माघारी घेण्याची मागणी करण्यात आली. कोलकाता शहरासह राज्यभरात टीएमसीच्या कार्यकर्ते, नेत्यांनी रस्त्यांवर उतरून आंदोलन केले.

तमिळनाडू, पुद्दुचेरीत कार्यालये बंद
तमिळनाडू आणि पुद्दुचेरीत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. विरोधी पक्ष डीएमके आणि काँग्रेसने राज्यभरात निदर्शने केली. पुद्दुचेरीत सत्ताधारी काँग्रेसने बंदला पाठिंबा दिल्याने बस वाहतूक बंद होती. बस शिवाय टॅक्सी, रिक्षा ही बंद होत्या. वाहतूक विस्कळित झाली होती.

तेलंगणात टीआरएस बंदमध्ये सक्रिय
तेलंगणात सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस) बंदला पाठिंबा दिला होता. टीआरएसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात रस्त्यांवर उतरून निदर्शने केली. बंदमध्ये टीआरएस सक्रिय सहभागी झाली होती. लोकसभेतील टीआरएसचे नेते नामा नागेश्‍वर राव यांनी निदर्शने केली.


इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...