Agriculture news in marathi Big response to the bandh called for Maratha reservation in Solapur district | Agrowon

सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सोमवारी (ता.२१) बंदची हाक दिली होती. 

सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सोमवारी (ता.२१) बंदची हाक दिली होती. दगडफेकीचे काही किरकोळ प्रकार वगळता या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तत्पूर्वी सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी सकाळी आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींच्या घरावर धडक देऊन त्यांना निवेदन देत मागणीकडे लक्ष वेधले. 

सोलापूर शहरात सकाळपासूनच सर्व व्यापारपेठा बंद होत्या. काही अत्यावश्‍यक सेवेची दुकाने सुरु होती. बाकी सर्वत्र शांतता राहिली. सकाळी दहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मराठा समाज कार्यकर्त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख, त्यानंतर आमदार सुभाष देशमुख, आमदार प्रणिती शिंदे आणि खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्या घरावर मोर्चाद्वारे धडक दिली. तिथे या लोकप्रतिनिधींना भेटून निवेदन देत आमच्या मागणीवर सरकारकडे दाद मागा, अशी विनंती केली. 

यावर सर्वच लोकप्रतिनिधींनी आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत, आपण सर्वोतपरी मदत करु, स्वतः यासाठी आग्रही राहू, असे आश्‍वासन मोर्चेकऱ्यांना दिले. सकाळी पार्क चौकात समाजाच्या वतीने सरकारवर ‘आसूड ओढो’ आंदोलन झाले. यावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देताना ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ असं म्हणत मागण्यांकडे लक्ष वेधलं. 

सोलापुरात या आंदोलनादरम्यान पार्क चौकातील ब्रम्हदेव माने बॅंकेच्या एटीएमवर आणि सातरस्ता परिसरातील एका दुकानावर दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या. परंतु, पोलिसांनी वेळीच या ठिकाणी बंदोबस्त वाढवत शांतता प्रस्थापित केली.

दरम्यान, जिल्ह्यातही अक्कलकोट, पंढरपूर, माढा, मोहोळ तालुक्‍यात सगळीकडे या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला. सांगोला, बार्शी, मोहोळमध्ये कार्यकर्त्यांनी रास्ता-रोको आंदोलन केले. अकलूजमध्ये चप्पल मारो आंदोलन केले. पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात जागरण गोंधळ करुन लक्ष वेधण्यात आले. 
 

 
 


इतर बातम्या
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...