agriculture news in marathi, Big response to 'Bandh' in Khandesh | Agrowon

खानदेशात ‘बंद’ला जोरदार प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

जळगाव : आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. ९) पुकारलेल्या सकल मराठा समाजाच्या बंदला खानदेशात जोरदार प्रतिसाद मिळाला. कुठेही हिंसक घटना घडल्या नाहीत. सर्वच प्रमुख शहरांत कडकडीत बंद पाळण्यात आला. प्रमुख बाजारपेठा, महाविद्यालये, बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. केळी वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूकदारांनीही बंद पाळला. यामुळे कोट्यवधींचे व्यवहार थांबले.

जळगाव : आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता. ९) पुकारलेल्या सकल मराठा समाजाच्या बंदला खानदेशात जोरदार प्रतिसाद मिळाला. कुठेही हिंसक घटना घडल्या नाहीत. सर्वच प्रमुख शहरांत कडकडीत बंद पाळण्यात आला. प्रमुख बाजारपेठा, महाविद्यालये, बाजार समित्या बंद ठेवण्यात आल्या. केळी वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूकदारांनीही बंद पाळला. यामुळे कोट्यवधींचे व्यवहार थांबले.

नंदुरबार जिल्ह्यात मराठा मोर्चाकडून बंद मागे घेतल्याची घोषणा बुधवारीच (ता. ८) करण्यात आली होती. यामुळे सर्व व्यवहार सुरळीत झाले. धुळे व जळगाव येथे बाजार समितीमधील भाजीपाला मार्केट यार्डात मात्र लिलाव सुरळीत झाले. आंदोलकांनी बंदचे आवाहन केले. जळगाव शहरात नवी पेठेनजीकच्या सर्व बाजारपेठा बंद होत्या. धुळ्यात देवपूर, महामार्ग भागात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. 

धुळे व जळगाव बाजार समित्यांमध्येही बंदची स्थिती होती. अनेक व्यापाऱ्यांनी डाळींची पाठवणूक, खरेदी बंद ठेवली. भाजीबाजारात लिलाव झाले, पण आवक कमी होती. चाळीसगाव, रावेर, पाचोरा-भडगाव, धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथेही बाजार समित्यांमध्ये बंदची स्थिती होती.

मालवाहतूकदारांनीही बंद पाळला. त्यांची सुमारे साडेचार कोटींची उलाढाल थांबली. नंदुरबारात जागतिक भूमिपुत्र दिनाची शासकीय सुटी जिल्हाधिकारी यांनी जाहीर केली होती. तेथील शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद व खासगी संस्थांच्या शाळा, महाविद्यालयांना सुटी होती.

केळी पाठवणुकीवर परिणाम
केळीची वाहतूकही बंदने अडचणीत आली. अनेक मालवाहतूकदारांनी वाहने दिली नाहीत. काही व्यापाऱ्यांनी आपल्या जोखमीवर मालवाहू वाहने मध्य प्रदेशातून आणून वाहतूक करून घेतली. परंतु अनेक स्थानिक केळी व्यापाऱ्यांनी खरेदी बंद ठेवली. यामुळे यावल, रावेर व चोपड्यातून फक्त १६० ट्रक (एक ट्रक १५ मेट्रिक टन क्षमता) केळीची वाहतूक झाली. सुमारे १०० ट्रक केळीची कापणी व वाहतूक रखडल्याचे सांगण्यात आले.

बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) येथील बाजारावरही आंदोलनाचा परिणाम झाला. तेथेही केळीची आवक नेहमीपेक्षा कमी झाली. सुमारे १२० ट्रक केळीची कमी आवक झाली. केळी वाहतूक बंद राहिल्याने जवळपास सात ते आठ कोटींचा फटका रावेर, यावल, चोपडा, जळगाव, मध्य प्रदेशातील वाणिज्य आस्थापने व इतर संबंधित संस्थांना बसल्याचे सांगण्यात आले.

गुरुवारी (ता. ९)  सकाळपासून धुळे व जळगाव एसटी बस आगारातून मराठवाडा भागातील एसटी बस वाहतूक बंद ठेवण्यात आली.

जळगाव शहरातील दाणा बाजारातही बंदमुळे व्यवहार ठप्प होते. आत्यावश्यक सेवा सुरू होती. फूल मार्केटही बंद होते. जळगावातील वल्लभदास वालजी (गोलाणी) व्यापारी संकुलात बंदचे आवाहन करण्यासाठी आलेल्या काही व्यक्तींनी आरडाओरड केली. यामुळे पळापळ झाली. आंदोलकांनी आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली.

इतर बातम्या
कृषी निविष्ठा विक्रेत्यांना आरोपी नव्हे...पुणे : राज्यात खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री...
आनंदाची पातळी बदलतेय उत्पन्नांनुसारआजच्या जगामध्ये सामाजिक आर्थिक निकषांमध्ये वेगाने...
सजीव प्रजातींची सर्वमान्य यादी...पृथ्वीवरील सर्व ज्ञात प्रजातींची जागतिक पातळीवर...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात कृषी...औरंगाबाद : मागण्यांबाबत कार्यवाही होत नसल्याने...
परभणी जिल्ह्यात आधार प्रमाणिकरणाचे २९...परभणी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
परभणी, नांदेड, हिंगोलीत निविष्ठा...परभणी : कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी विविध...
सांगली जिल्ह्यात खते, बियाण्यांच्या ६९...सांगली :‘कृषी विभागाने जिल्ह्यातील ६९ किटकनाशके,...
सांगली जिल्ह्यात दोन लाख १९ हजार हेक्‍...सांगली : जिल्ह्यात पावसांचा खंड असला तरी  ...
कोल्हापुरात दिड हजार, खते, बियाणे...कोल्हापूर  : बियाण्यांच्या उगवणीप्रश्नी...
विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळेनागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य...
नाशिक जिल्ह्यात कृषी निविष्ठा...नाशिक : कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरील...
वऱ्हाडात कृषी विक्रेत्यांचा कडकडीत बंदअकोला : सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न...नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला....
राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरूपुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी...
सोलापुरात कृषी सेवा केंद्रांचा बंद...सोलापूर : बियाणे उगवणीबाबत झालेल्या तक्रारीच्या...
शेती क्षेत्रातील बदल टप्याटप्याने...नागपूर ः शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कृषी...
पुणे जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रे बंदपुणे : महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टीसाईड्स...
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
बेलखेडा होणार संत्रा उत्पादक गावरिसोड, जि. वाशीम ः तालुक्यातील दोन हजार लोकसंख्या...
औरंगाबाद जिल्ह्यातील थेट शेतमाल विक्री...औरंगाबाद : कोरोना संकटामुळे शेतकरी ते ग्राहक...