नागपूर ः एकीकडे जनुकीय सुधारित (जीएम) पिकांच्या संशोधनासाठी वार्षिक दोन हजार कोटी रुपयांच
ताज्या घडामोडी
कोल्हापुरात पुष्पप्रदर्शनाला मोठा प्रतिसाद
कोल्हापूर : स्वागत कमानीपासूनच विविध प्रकारच्या फुलांची सजावट असलेल्या गार्डन्स क्लब आयोजित पुष्पप्रदर्शनाला दुसऱ्या दिवशी मोठा प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनात ३५० पेक्षा अधिक फुलांचे प्रकार तसेच विविध प्रकारच्या ऑर्किड्स, एक्झॉटिक फ्लॉवर्स, सक्युलंटस्, अडेनियम, कॅक्टसच्या व्हरायटीज, एक्वेरियम प्लांट, वर्टीकल गार्डन, नक्षत्र गार्डन लक्षवेधी ठरत आहेत. तसेच जापनीज, फुजन यांसह विविध प्रकारातील विविध लँडस्केप डिझाईन उद्यान प्रेमींच्या पसंतीस पडत आहेत. पाना फुलांनी सजवलेल्या मॅनाक्वीन सेल्फी पॉइंट ठरला आहे.

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व वयोगटांतील पर्यावरण प्रेमींसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. मोठ्या वयोगटात २० स्पर्धक होते आणि छोट्या वयोगटात ८० पेक्षा जास्त जणांनी सहभाग घेतला. त्यानंतर इको फ्रेंडली होम गार्डन या विषयावर डॉ. संग्राम धुमाळ यांनी मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रामध्ये डेकोरेशन क्राफ्ट या विषयावर संगीता सांडव यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर मेटल व मुरल्सचे प्रात्यक्षिक घेतले.
सायंकाळी शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग आणि बोटॅनिकल फॅन्सी शो झाला. मानसी शहा यांच्या साद या शॉर्ट फिल्म प्रथम क्रमांक मिळवला. पाणी राणी, सुमित पाटील यांनी दुसरा क्रमांक आणि पाखरे सगे सोयरे या मिलिंद रणदिवे यांच्या शॉर्ट फिल्मला तिसरा क्रमांक मिळाला. बक्षिसांचे वितरण इंटरनॅशनल फिल्म डायरेक्टर करण चव्हाण यांच्या हस्ते झाले.
इको फ्रेंडली स्वागत कमान
टोपल्या, कागद आणि पोत्याच्या वापरातून इको फ्रेंडली स्वागत कमान येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे. टाकाऊ वस्तूंचा वापर करून केलेली ही कलात्मक सजावट कल्पना थोरात व रूपा शिंदे यांनी तयार केली आहे.
- 1 of 1027
- ››