नाशिक जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला मोठा प्रतिसाद

जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला मोठा प्रतिसाद
जिल्ह्यात वाहतूकदारांच्या संपाला मोठा प्रतिसाद

नाशिक : देशात वाढत चाललेली डिझेल दरवाढ, न परवडणारी टोल आकारणी, थर्ड पार्टी विम्यामध्ये अपारदर्शक वाढ, ई-वे बिल प्रणाली आदींमध्ये शासनाने दिलासा द्यावा. या प्रमुख मागण्यांसाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसकडून देशभर छेडण्यात आलेल्या संपाला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद लाभला आहे. संपामुळे जिल्ह्यातील १२ हजारांहून अधिक ट्रकची चाके थांबली असून पहिल्याच दिवशी सुमारे ७ कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे.

मागण्या मान्य होईपर्यंत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून गांधीगिरी पद्धतीने बेमुदत आंदोलन सुरूच राहील. तसेच, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या संलग्न असलेल्या व्यावसायिकांच्या एकाही ट्रकमधून मालाची वाहतूक होणार नाही, असे असोसिएशनतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.  

आडगाव ट्रक टर्मिनल, विल्होळी ट्रक टर्मिनल व चेहडी नाका येथे वाहने उभे करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आडगाव ट्रक टर्मिनल येथे ट्रकचालकांसाठी भोजनाची सेवा करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान ट्रकचालकांना असोसिएशनकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर ठिकाणी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या संलग्न असलेल्या व्यावसायिकांकडून ट्रकचालकांची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा यांनी दिली. या वेळी वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड, माजी अध्यक्ष अंजू सिंगल, नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल चंदा, चेअरमन एम. पी. मित्तल उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com