agriculture news in marathi, Big Shot of rain in the Solapur District | Agrowon

अवकाळीचा सोलापूर जिल्ह्याला मोठा फटका
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 एप्रिल 2019

सोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-मधून झालेला अवकाळी पाऊस आणि वादळवाऱ्याचा मोठा फटका बसला. त्यात साधारण जानेवारी ते एप्रिलपर्यंत या चार महिन्यांत जवळपास २४ जनावरे व दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. त्याशिवाय रब्बी हंगामातील उरली सुरली पिके आणि काढणी हंगामातही व्यत्यय आला. यंदा पाऊस कमी असल्याने आधीच शेतकऱ्यांमध्ये चिंता असताना, आता या प्रकारामुळे त्यांना आणखीनच धास्ती बसली आहे. 

सोलापूर : जिल्ह्याला गेल्या चार महिन्यांत अधून-मधून झालेला अवकाळी पाऊस आणि वादळवाऱ्याचा मोठा फटका बसला. त्यात साधारण जानेवारी ते एप्रिलपर्यंत या चार महिन्यांत जवळपास २४ जनावरे व दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. त्याशिवाय रब्बी हंगामातील उरली सुरली पिके आणि काढणी हंगामातही व्यत्यय आला. यंदा पाऊस कमी असल्याने आधीच शेतकऱ्यांमध्ये चिंता असताना, आता या प्रकारामुळे त्यांना आणखीनच धास्ती बसली आहे. 

गेल्या पंधरवड्यापासून तर पुन्हा अवकाळी वारे आणि पावसाने अनेक भागात हजेरी लावली. या महिन्यात बार्शी तालुक्‍यातील उंबरगे येथील सुरेश सागरे यांचा वीज पडून, तर दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील बंकलगी येथील महादेव दिंडुरे यांचा वाऱ्यामुळे घरावरील दगड पडून मृत्यू झाला. 

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे सांगोला येथील जवळपास ६० हून अधिक, तर मंगळवेढा येथील १५ पेक्षा अधिक घरांची पडझड झाली. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्याच्या कालावधीत २४ जनावरे दगावली आहेत. यामध्ये म्हैस, बैल यांचा समावेश आहे. त्याशिवाय रब्बी हंगामातील काही पिकांची काढणी सुरू होती. त्यालाही याचा फटका बसला. 

शासकीय पातळीवर त्यांचे पंचनामे आणि मदतीचे प्रस्ताव तयार आहेत. लवकरच संबंधितांना त्याची मदत मिळेल, पण तोपर्यंत शेतकरी मात्र अडचणीच्या फेऱ्यात अडकत असल्याचे दिसते आहे.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...