agriculture news in marathi, big water conservation in Marathwada | Agrowon

मराठवाड्यात भीषण जलसंकट
टीम अॅग्रोवन
रविवार, 19 मे 2019

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल ७०५ प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. त्यामध्ये कोरडेठाक पडलेल्या ३६, तर पाणी जोत्याखाली गेलेल्या ३४० प्रकल्पांचा समावेश आहे. एकूण ८७२ प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा १.८९ टक्‍क्‍यांवर आला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जलसंकट भीषण टप्प्यावर आले आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८२४ लघू मध्यम प्रकल्पांपैकी तब्बल ७०५ प्रकल्पांतील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. त्यामध्ये कोरडेठाक पडलेल्या ३६, तर पाणी जोत्याखाली गेलेल्या ३४० प्रकल्पांचा समावेश आहे. एकूण ८७२ प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा १.८९ टक्‍क्‍यांवर आला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जलसंकट भीषण टप्प्यावर आले आहे. 

मराठवाड्यातील लघू प्रकल्पांची अवस्था दुष्काळाने कमालीची बिकट बनली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांपैकी ६२ कोरडेठाक, तर १८ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. जालन्यातील ५७ लघू प्रकल्पांपैकी ४७ कोरडे आहेत. ८ मधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. बीड जिल्ह्याची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. तेथील १२६ लघू प्रकल्पांपैकी ८८ प्रकल्प कोरडे, तर २६ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. लातूर जिल्ह्यातील १३२ लघू प्रकल्पांपैकी ३८ कोरडे, तर ८० मधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक २०५ लघू प्रकल्पांपैकी ९८ प्रकल्पांत पाण्याचा थेंब नाही. दुसरीकडे ७७ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. नांदेड जिल्ह्यातील ८८ लघू प्रकल्पांपैकी ६२ मधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. परभणीतील २२ लघू प्रकल्पांपैकी १९ मधील पाणीसाठा जोत्याखाली, तर हिंगोलीतील २६ पैकी २३ लघू प्रकल्पांमधील पाणीसाठा जोत्याखाली आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांपैकी ११ प्रकल्पात पाण्याचा थेंब नाही. दुसरीकडे ३ मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. जालन्यातील ७ मध्यम प्रकल्पांपैकी ३ कोरडे, तर ४ मधील पाणी जोत्याखाली आहे. बीडमध्ये १६ मध्यम प्रकल्पांपैकी ९ कोरडे, तर ६ मधील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. लातूर जिल्ह्यातील ८ मध्यम प्रकल्पापैकी एका प्रकल्पात पाणी नाही. चार प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. 

उस्मानाबादेत ८ प्रकल्प कोरडे
उस्मानाबाद जिल्ह्यातील १७ मध्यम प्रकल्पांपैकी ८ प्रकल्प कोरडे, तर ५ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे. नांदेडमधील ९ मध्यम प्रकल्पांपैकी ३ मधील पाणीसाठा जोत्याखाली आहे. 
परभणीतील दोन्ही मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. उर्वरित १६ मध्यम प्रकल्पांमध्येही २५ टक्‍क्‍यांच्या आतच पाणी उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

इतर अॅग्रो विशेष
राज्य बॅंकेच्या दारात जिल्हा बॅंकांचे...सोलापूर : राज्यात १९७२ ची आठवण करून देणारा भयावह...
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे  : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य...
पूर संकटाचा नव्याने अभ्यास पुणे  : कृष्णा व भीमा खोऱ्यात यंदा आलेल्या...
शेतजमीन मोजणीचा गोंधळ सुरूचपुणे : ड्रोनच्या माध्यमातून गावांचे डिजिटल नकाशे...
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराने शेतकरी...नागपूर ः ‘संकरित बियाण्यांचा करा पेरा, लक्ष्मी...
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
कृषिसेवक भरती प्रक्रियेवरील बंदी...अकोला ः कृषी खात्याने १४१६ जागांसाठी राबवलेल्या...
यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची...पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या...
पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४...मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक...पुणे  : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या...
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...