अचूक सांख्यिकीमुळे शेती उत्पन्न वाढविणे शक्य: बिल गेट्स

​प्राचीन काळात भारताकडे मोठी सांख्यिकी होती. देशातील कृषी क्षेत्रातील सांख्यिवर भर देण्याची आवश्‍यकता आहे. सर्व धोरणे ठरविताना आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविताना सांख्यिकीचे महत्त्व मोठे आहे. - नरेंद्रसिंह तोमर, केंद्रीय कृषिमंत्री
BIll Gates says farm income can improve
BIll Gates says farm income can improve

नवी दिल्ली: बदलत्या हवामानाच्या आव्हानावर अचूक सांख्यिकी, योग्य माहिती आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतकरी मात करु शकतात. त्यामुळे अल्पभुधारक शेतकऱ्यांना या सुविधा उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांचे उत्पान्न २० टक्क्यांनी वाढेल, असे प्रतिपादन मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी केले.  येथील पार पडलेल्या ८ व्या आंतरराष्ट्रीय कृषी सांख्यिकी परिषदेत बिल गेट्स बोलत होते. कृषी क्षेत्राबाबत अचूक माहिती मिळणे कठीण आहे. त्यामुळे शेतीवरील संकटे दिवसेंदिवस वाढत आहेत. या संकटांवर मात करण्यासाठी अचूनक माहिती नसल्याने उपाययोजना करणेही शक्य होत नाही. २०१५ च्या कृषी गणनेनुसार देशात १४ कोटी ५० लाख शेतकरी आहेत. त्यापैकी तब्बल १२ कोटी शेतकरी हे अल्पभूधारक आणि मध्यम भूधारक आहेत.   परिषदेत मार्गदर्शन करताना बिल गेट्स म्हणाले, की योग्य आणि अचूक माहिती पुरविल्यास आपण जगातील तब्बल २०० कोटी शेतकऱ्यांना तत्काळ हवामान बदलास अनुकूल शेतकरी आत्मसात करण्यास मदत करू शकतो. अचूक सांख्यिकी अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पिकांची उत्पादकता वाढीसाठी उपयुक्त ठरेल. भविष्यात हवामान बदलामुळे अल्पभुधारक शेतकरी आणखीनच प्रभावित होतील. त्यामुळे कृषी आणि हवामान बदलाविषयीची अचूक माहिती शेतकऱ्यांना मिळणे आवश्‍यक आहे. तसेच आपण मृदा वैशिष्ट्ये समजून घेणेही आवश्‍यक आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मृदेमध्ये वेगवेगळे पोषणद्रव्ये असतात.  पिकांवरील परिणामाची माहिती महत्त्वाची  वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरविण्यासाठी आपण जेव्हा उत्पादकता वाढीचा विचार करतो तेव्हा आपण हवामान बदलाचा गांभीर्याने अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. त्याशिवाय पिकांची उत्पादकता वाढविणे अशक्य आहे. हवामान बदलामुळे अपल्या पिकांवर आणि उत्पादकतेव काय परिणाम होईल आणि कृषी सांख्यिकीत नविन साधनांचा वापर करून आपण हे परिणाम कसे समजू यावर हे अवलंबून आहे. त्यामुळे अचूक सांख्यिकीमुळे या परिणामांचा अभ्यास करून पीक नियोजन करून उत्पादकता वाढविणे शेतकऱ्यांना शक्य होईल, असेही बिल गेट्स म्हणाले.  अधिकृत माहितीचा अभाव भारतात अचूक आकडेवारी आणि सांख्यिकीचा मोठा अभाव आहे. देशातील वाया जाणारे अन्न, सिंचन आणि अन्नधान्य उत्पादनाविषयीची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. बरीच आकडेवारी ही अंदाजे किंवा हस्तलिखित असते. त्यामुळे या क्षेत्रांचा अभ्यास करताना किंवा धोर ठरविताना समस्या येतात. त्यामुळे नवनवीन साधनांचा वापर करून गुणवत्तापूर्ण सांख्यिकी तयार करणे आवश्‍यक आहे. जेणेकरून या सांख्यिकीचा वापर धोरणात्मक निर्णय आणि धोरण निर्मितीसाठी करता येईल.  प्रतिक्रिया उत्तम सांख्यिकीमुळे देशातील शेती आणि अन्न क्षेत्रातील अनेक समस्या सोडविणे शक्य आहे. त्यासाठी सांख्यिकीवर काम करणे आवश्‍यक आहे.  - रमेश चंद, निती आयोगाचे सदस्य  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com