Agriculture news in marathi Billions are yet to come from ‘Twenty-One Sugars’ | Agrowon

‘ट्वेन्टीवन शुगर्स’कडून कोट्यावधीचे येणे बाकी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021

परभणी ः सन २०२०-२१ च्या हंगामात गाळप केलेल्या उसाचे थकीत बिल व्याजासह शेतकऱ्यांना तत्काळ अदा करावे. त्यानंतरच यंदाचा (२०२१-२२) गाळप हंगाम सुरु करावा, या मागणीसाठी सोमवारी (ता.२५) शेतकऱ्यांनी सायखेडा (ता. सोनपेठ) येथील ट्वेन्टीवन शुगर्स कारखान्यात ठिय्या मांडत ‘जवाब दो’ आंदोलन केले.

परभणी ः सन २०२०-२१ च्या हंगामात गाळप केलेल्या उसाचे थकीत बिल व्याजासह शेतकऱ्यांना तत्काळ अदा करावे. त्यानंतरच यंदाचा (२०२१-२२) गाळप हंगाम सुरु करावा, या मागणीसाठी सोमवारी (ता.२५) शेतकऱ्यांनी सायखेडा (ता. सोनपेठ) येथील ट्वेन्टीवन शुगर्स कारखान्यात ठिय्या मांडत ‘जवाब दो’ आंदोलन केले.

शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे निमंत्रक कॉ. विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. सायखेडा येथील ट्वेन्टीवन शुगर्स कारखान्याकडे परभणी तसेच शेजारील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या ५ लाख २२ हजार ७४९ टन उसाचे प्रतिटन ५०० रुपये या प्रमाणे येणे बाकी आहे. ती शेतकऱ्यांच्या खात्यांवर १५ टक्के व्याजासह जमा करावी. यंदाच्या गाळप हंगामात केंद्र सरकारने निश्चित केलेल्या दराने एकरकमी एफआरपी अदा करणार की नाही? साखर उतारा कमी न दाखवता आणि तोड व वाहतूक खर्च वाढवून न दाखवता कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी जाहीर केली, त्याप्रमाणे एफआरपी देणार की नाही? आदी प्रश्न कारखाना प्रशासनास विचारत शेतकऱ्यांनी ‘जवाब दो’ आंदोलन केले.

या मागण्या मंजूर करेपर्यंत असहकार आंदोलन करत गाळप करु दिले जाणार नाही, असा इशारा या वेळी देण्यात आला. बाबर, मदनराव वाघ, परमेश्वर वाघ, सुधीर बिंदू, विश्वांभर गोरवे, कपिल धुमाळ, रमेश मोकाशे आदींसह  शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनामुळे कारखाना प्रशासनाने सोमवारी (ता.२५) या कारखान्याचा मोळी टाकण्याचा कार्यक्रम लवकरच उरकून घेतला.
 


इतर बातम्या
इथेनॉलच्या दरात दुजाभाव नकोधान्यापासून इथेनॉल उत्पादित करणाऱ्यांनी सरकारकडे...
'AI' च्या मदतीने कापसाचे विक्रमी...तेलंगणात या खरीप हंगामात कापसाला  (Cotton)...
दक्षिण पूर्व आशियाई देशांकडून भारतीय...दक्षिण पूर्व आशियाई देश यामध्ये प्रामुख्याने...
महाराष्ट्रात ११ महिन्यांत २४९८...  जानेवारी ते नोव्हेंबर २०२१ या ११...
भात उत्पादक शेतकऱ्यांचा इतर पिकांकडे कल...गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून कृषी तज्ज्ञ...
खानदेशात उन्हाळी बाजरी पेरणी रखडतजळगाव : खानदेशात उन्हाळी बाजरीची पेरणी सुमारे तीन...
उसाच्या थकीत बिलासाठी तासगावात आंदोलनसांगली ः तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकीत...
चिखलदऱ्याच्या कॉफीला राज्यभरातून मागणीचिखलदरा, जि. अमरावती : कॉफी संपूर्ण महाराष्ट्रात...
बुलडाण्यातील शेतकरी पिकवतोय...बुलडाणा ः स्ट्रॉबेरी म्हटली की थंड वातावरणात...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढला असल्याने अनेक...
कृष्णा खोऱ्यातील उर्वरित पाणी वर्षभरात...पुणे : कृष्णा पाणीवाटप लवादाच्या पहिल्या...
सोयापेंड निर्यातीसाठी वाहतूक अनुदान...पुणे ः देशात यंदा सोयापेंडचे दर अधिक असल्याने...
कापूस मोजमापात पापवाशीम : शेतकऱ्यांना लुबाडणारी एक व्यवस्थाच तयार...
महावितरणने चालवलेली लूट थांबवा पुणे : महावितरणने शेतकऱ्यांकडे थकबाकी दाखवून...
आंबेगावच्या आदिवासी भागात मनरेगाची...पुणे : आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील एकूण...
नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग...नगर ः नगर जिल्ह्यात आठ दिवसांपासून कोरोना...
शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास...सिन्नर, जि. नाशिक : तालुक्याच्या पूर्व भागात...
लासलगावातून पहिल्यांदाच द्राक्षे...लासलगाव, ता. निफाड : जिल्ह्यातील द्राक्ष काढणी...
खानदेशात भेंडीचे दर स्थिरजळगाव ः  खानदेशात भेंडीचे दर टिकून आहेत...
सोलापूर जिल्हा दूध संघासाठी २६...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व...