Agriculture news in Marathi Biomix gives a different identity to the university: Dr. Dhawan | Page 2 ||| Agrowon

‘बॉयोमिक्‍स’मुळे विद्यापीठास वेगळी ओळख प्राप्‍त ः डॉ. ढवण

टीम अॅग्रोवन
सोमवार, 1 मार्च 2021

बायोमिक्‍सने विद्यापीठास वेगळी ओळख प्राप्‍त करून दिली आहे, असे गौरवोद्‍गार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

परभणी ः वनस्पती रोगशास्त्र विभागातर्फे निर्मित बायोमिक्स या जैविक घटक उत्पादनाच्या विक्रीतून विद्यापीठाच्‍या इतिहासात प्रथमच एका आर्थिक वर्षात एका कृ‍षी निविष्‍ठापासून अडीच कोटींपेक्षा जास्‍त महसूल प्राप्‍त झाला. बायोमिक्‍सने विद्यापीठास वेगळी ओळख प्राप्‍त करून दिली आहे, असे गौरवोद्‍गार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले.

परभणी कृषी महाविद्यालयातील वनस्‍पती रोगशास्‍त्र विभाग प्रमुख डॉ. कल्‍याण आपेट यांना भारतीय वनस्‍पती रोगशास्‍त्र संस्‍था, नवी दिल्‍ली आणि अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वनस्‍पती रोगशास्‍त्रज्ञ संस्‍थेच्‍या वतीने वनस्‍पती रोगशास्‍त्रात केलेल्‍या उत्‍कृष्‍ट कार्याबद्दल बुधवारी (ता. २४) डॉ. ढवण यांच्‍या हस्‍ते गौरव करण्यात आला.

या वेळी संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ. सय्यद इस्‍माईल, ऑनलाइन माध्यमातून संस्‍थेचे अध्‍यक्ष डॉ. बी. टी. राऊत, सचिव डॉ. आर. एम. गाडे, डॉ. के. डी. ठाकूर, डॉ. ए. पी. सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. ढवण म्‍हणाले, की डॉ. आपेट, त्‍यांचे सहकारी यांच्‍या अविरत परिश्रमामुळे बायोमिक्‍स या जैविक मिश्रणाचा शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसार झाला. बयोमिक्‍स हे उपयुक्‍त सूक्ष्‍मजीवांचे मिश्रण आहे. जैविक कीडनाशक व रोगनाशक म्हणून विविध पिकांवर कार्य करते. याचा शेतकरी फळे, भाजीपाला, हळद आदी पिकांत मोठ्या प्रमाणात करत आहेत.

ऑनलाइन पुरस्‍कार वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. योगेश इंगळे यांनी केले. या वेळी डॉ. के. डी. नवगिरे, डॉ. विक्रम घोळवे, डॉ. महेश दडके, डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. सी. व्ही. अंबाडकर, डॉ. संतोष पवार आदींसह संस्‍थेचे सदस्‍य ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
पाच दिवसांत तब्बल ५० टन काजू बी खरेदी सिंधुदुर्गनगरी ः फळपीक बागायतदार संघाने गेल्या...
वाढत्या तापमानातील द्राक्ष बागेतील...प्रत्येक भागात सध्याच्या परिस्थितीचा विचार करता...
नगर : पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग...नगर : नैसर्गिक संकटाने तसेच अन्य कारणाने...
`दहिगाव उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर...सोलापूर ः करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन...
पुणे बाजार समिती चक्राकार पद्धतीने सुरू...पुणे : कोरोना विषाणू बाधित रुग्णाच्या झपाट्याने...
देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरीसोलापूर ः देशी सीताफळाच्या बियाण्याची चोरी...
पाण्याच्या उपलब्धतेमुळे उन्हाळी...पुणे : गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे...
हिंगोली ः सोयाबीनची अडीच लाख हेक्टरवर...हिंगोली ः जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात ३ लाख ५८...
अमरावतीत खरिपाचे ७ लाख हेक्टर क्षेत्र...अमरावती : कृषी विभागाच्या खरीप हंगाम २०२१...
नाशिक बाजार समितीच्या ‘त्या’ याचिका...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती...
बियाणे, खते, कीटकनाशक नियंत्रणासाठी...नाशिक : खरीप हंगामात बियाणे पेरणीचा कालावधी...
औरंगाबाद जिल्हाभरात फळे, भाजीपाला थेट...औरंगाबाद : शहरासह जिल्हाभरात राबविल्या जात...
लातूर जिल्ह्यात त्रेचाळीस हजार क्विंटल...लातूर: जिल्ह्यात कार्यान्वित १६ केंद्रांवरून २७५९...
अवैध दारू विक्रेत्यांना शासकीय योजनांचा...चंद्रपूर : अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक स्वास्थ्य...
ऑक्सिजन प्रकल्प उभारणीचा अधिकार...मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या व ऑक्सिजनची...
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...